आ.ओगले-ससाणेंनी साधला निवडणूक आयोगावर निशाणा;श्रीरामपुरात काँग्रेसची जोरदार निदर्शने

श्रीरामपूर-विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मतांची हेराफेरी करून बोगस मतदानाद्वारे भाजपाने आपले लोक निवडून आणले आणि त्याच जोरावर सत्ता...

श्रीरामपूर-
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मतांची हेराफेरी करून बोगस मतदानाद्वारे भाजपाने आपले लोक निवडून आणले आणि त्याच जोरावर  सत्ता स्थापन केली या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या साथीने झाल्या असल्याचा आरोप आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे तसेच देशातील काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग अजून गप्प कसे असा सवाल देखील आ. ओगले यांनी केला आहे. श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस करण ससाणे म्हणाले की, निवडणूक आयोग हे घरगड्यासारखे काम करत असून एकाच नावाचे असंख्य मतदार नोंदवून तसेच हयात मयत लोकांची देखील यादीत नावे समाविष्ट करून निवडणुका जिंकल्या याचा आम्ही निषेध करत असून निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे ससाणे यांनी म्हटले. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव दिपाली ससाने म्हणाले की, आमचे नेते खा.राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले परंतु निवडणूक आयोगाच्या ऐवजी भाजपाचे प्रवक्ते उत्तर देताना दिसत आहे त्यामुळे हे स्पष्ट होते की केंद्रातील सरकार हे बोगस मतदानांमुळेच सत्तेवर आले असल्याचे सांगितले.यावेळी सचिन गुजर, बाबासाहेब दिघे,  सभापती सुधीर नवले,  ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले,शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर नगरसेवक दिलीप नागरे,वंदना मुरकुटे, अशोकभाई बागुल, रितेश रोटे, महांता यादव, सौ संगीता मंडलिक, मुन्ना पठाण, के सी शेळके,कलीम कुरेशी, नजीर मुलानी, मार्केट कमिटीचे संचालक राजू चक्रनारायण, राणी देसरडा, अशोकराव बागुल, शंकरराव फरगडे, प्रवीण नवले, रितेश एडके,डॉ. राजेंद्र लोंढे,सरवर अली मास्टर, जावेद शेख, मिथुन शेळके, अशोक जगधने, सुरेश दुबे, सुनील साबळे, रियाज खान पठाण, वैभव पंडित, प्रताप कवडे, अतुल खरात, अमोल आवटे, भैय्या भाई अत्तार, रितेश चव्हाणके,सरबजीत सिंग चुग, शाहरुख शेख, अमोल नाईक, सनी मंडलिक, वैभव कुऱ्हे, जाफर शहा, रजाक  पठाण, प्रशांत राऊत, अतिश देसरडा, गणेश काते, कुणाल पाटील, शुभम पाटील, युनूस पटेल, बाबा वायदंडे, शहानवाज बागवान, विशाल साळवे, राजेंद्र भोसले, राजेश जोंधळे, बबलू पठाण, संजय गोसावी, जियान पठाण, तीर्थराज नवले, आकाश जावळे, कल्पेश पाटणी, सागर दुपाटी, प्रशांत आल्हाट, सिमोन चूग, सागर दुपाटी, शिवतेज गोसावी आदी काँग्रेसचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

निवडणूक आयोगाचे घरगड्यासारखे काम-ससाणे
निवडणूक आयोग हे घरगड्यासारखे काम करत असून एकाच नावाचे असंख्य मतदार नोंदवून तसेच हयात व मयत लोकांची देखील यादीत नावे समाविष्ट करून मोठ्या प्रमाणावर मतांची हेराफेरी करून बोगस मतदानाला एक प्रकारे प्रोत्साहन दिले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!