हिंदू धर्म रक्षणाचे कार्य अविरतपणे सूरु ठेवा-श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज;शिवसेना नेते बेग यांनी घेतले आशीर्वाद

श्रीरामपूर-धर्मांतर,लव्ह जिहाद, लँड जिहाद,गो हत्या या विरोधात शिवसेना नेते व राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्षसागर बेग यांचे राज्यभर अविरतपणे चालू असलेले कार्य...

श्रीरामपूर-
धर्मांतर,लव्ह जिहाद, लँड जिहाद,गो हत्या या विरोधात शिवसेना नेते व राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष
सागर बेग यांचे राज्यभर अविरतपणे चालू असलेले कार्य अलौकिक आहे.असे हे धर्मकार्य पुढेही सुरूच ठेवा असे स्पष्ट करत बेग यांच्या धर्मकार्याला  नाणीजधामचे जगद्गुरू रामानंदचार्य श्रीस्वामी नरेंद्रचार्य महाराज यांनी शुभ आशीर्वाद दिले आहेत.नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या पावनभूमीत समस्या, मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.त्या कार्यक्रमास उपस्थित राहून सागर बेग यांनी जगद्गुरू नरेंद्रजी महाराज यांचे शुभाशीर्वाद घेतले. आतापर्यन्त हिंदू धर्म सोडून इतर धर्मात गेलेल्या संपूर्ण देशातील 1,51,000 हिंदूना पुन्हा हिंदू धर्मात विधीवत प्रवेश नरेंद्र महाराज यांनी दिला आहे.नरेंद्रजी महाराजांशी सागर बेग यांनी धर्मकार्यावर सविस्तर चर्चा केली.लाखो भक्तांच्या उपस्थित होणाऱ्या या दर्शन सोहळा कार्यक्रमातून वेळ काढून जगद्गुरू नरेंद्रजी महाराजांनी सागर बेग यांच्या धर्मकार्याची त्यांच्याकडून माहिती घेतली.सागर बेग यांचे चालू असलेले धर्मकार्य अखंड अविरत चालू राहावे म्हणून जगद्गुरू नरेंद्रजी महाराजांनी सागर बेग यांना यावेळी आशीर्वाद दिले.याप्रसंगी राष्ट्रीय श्रीराम संघाचे राहता तालुकाध्यक्ष मदन आप्पा मोकाटे,तुषार थेटे यांच्यासह राष्ट्रीय श्रीराम संघांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपास्थित होते.

शिवसेना नेते सागर बेग यांनी जगद्गुरू नरेंद्रजी महाराज यांचे दिंडोरी येथील कार्यक्रमात शुभाशीर्वाद घेतले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!