बेलापूर येथे नवीन पोलीस स्टेशन करा; पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मागणी

बेलापूर व परिसरातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख लक्षात घेता, येथील पोलिस दूरक्षेत्राच्या जागी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु करण्याची मागणी...

Belapur Police Station request

बेलापूर व परिसरातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख लक्षात घेता, येथील पोलिस दूरक्षेत्राच्या जागी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे करण्यात आली. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी निवेदन सादर केले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-बेलापूर येथे सध्या पोलिस दूरक्षेत्र असून गावाची लोकसंख्या, विस्तार, दूरक्षेत्राचे कार्यक्षेत्र तसेच हद्दीत वाढत्या गुन्हांची संख्या लक्षात घेता बेलापूर येथे नविन पोलिस स्टेशन कार्यान्वित करावे, अशी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचेकडे करण्यात आली आहे.


पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी नुकतीच श्रीरामपूरला भेट दिली. त्याप्रसंगी बेलापूर, ऐनतपूर, बेलापूर खुर्द, नर्सरी, वळदगाव, उंबरगाव, एकलहेरे, पढेगाव, उक्कलगाव या गावांचा समावेश होऊन बेलापूर बुद्रूक येथे नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई, अॅड. अरविंद साळवी, महेश कुहे, अभिषेक नवले आ आदी उपस्थित होते. बेलापूर पोलिस दूरक्षेत्र हे सध्या श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला संलग्न आहे. येथे पोलिस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबल अशी पदे आहेत. बेलापूर-ऐनतपूर गावाचा विस्तार, दूरक्षेत्राचे कार्यक्षेत्र लक्षात घेता पुरेसे कर्मचारी पोलिस स्टेशन असणे गरजेचे आहे याकडे निवेदनाव्दारे घार्गे यांचे लक्ष वेधण्यात आले.

“पोलीस कर्मचारी व संसाधनांची कमतरता लक्षात घेता, बेलापूरसारख्या वाढत्या गावासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनची गरज आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Tags: #BelapurNews #PoliceStationDemand #ShrirampurLive

Author Name : ✍️ नितिन शेळके प्रतिनिधी – श्रीरामपूर लाईव्ह

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!