सैनिकांसाठी पाठविल्या ११ हजार राख्या;श्रीरामपूरच्या सौ.पूजा चव्हाण यांचा उपक्रम

श्रीरामपूर-देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीरामपूर येथील सौ.पूजा हर्षद चव्हाण यांनी ११ हजार जवानांना...

श्रीरामपूर-
देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीरामपूर येथील सौ.पूजा हर्षद चव्हाण यांनी ११ हजार जवानांना राख्या पाठविल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून पूजा चव्हाण या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व इतर उपक्रम त्यांच्या मार्फत राबविले जातात. अहिल्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व भाजप उत्तर अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस असलेल्या पूजा चव्हाण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खा.सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १२ वर्षांपासून भारतीय सैन्य दलांना राख्या पाठवितात.यंदाही मेघालय,आसाम,जम्मू,लडाख पंजाब,बेंगलोर ,अंबाला आदी  ठिकाणी जवानांना पोस्टाद्वारे ११ हजार राख्या पूजा चव्हाण यांनी पाठविल्या आहेत.श्रीरामपूर येथे माजी खा.डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते जवानांना राख्या पाठविण्यात आल्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,गिरीधर आसने,अभिषेक खंडागळे,भाऊसाहेब बांदरे ,मंजुषा ढोकचौळे,पुष्पलता हरदास यांसह अनेक पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या.रक्षाबंधन हे आता बहीण-भावापुरते मर्यादित न राहता, रक्षणकर्त्या प्रत्येक घटकांशी बांधील झालेले आहे. निसर्गाशीही रक्षाबंधनाचे नाते जोडले गेले आहे. अशा वेळी जीव धोक्यात घालून भारतीय सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत राख्या पोहोचविण्याचे पूजा चव्हाण यांचे कार्य निश्चित सैनिकांचे मनोधैर्य उंचाविणारे असल्याचे डॉ.सुजय विखे म्हणाले.राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

पूजा चव्हाण यांनी माजी खा.डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते सैनिकांसाठी राख्या पाठविल्या आहेत.यावेळी मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,गिरीधर आसने,अभिषेक खंडागळे,भाऊसाहेब बांदरे आदी.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!