राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना मानाचा ‘धर्म रक्षक पुरस्कार’;शिर्डी येथे महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हस्ते बेग यांचा सन्मान*

श्रीरामपूर –
अखिल भारतीय हिंदू धर्म परिषदेच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘धर्म रक्षक पुरस्कार’ या वर्षी
शिवसेनेचे नेते,राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे हरियाणा येथील महान तपस्वी महायोगी श्री श्री 1008  महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.अखिल भारतीय हिंदू धर्म परिषद ही सनातन धर्म प्रचार व प्रसार  करणारी देशातील  सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेच्या वतीने हिंदू धर्माचे काम करणारे व्यक्तींना प्रत्येक वर्षी हा मानाचा हिंदू धर्म रक्षक प्रदान केला जातो.यावर्षीचा हा पुरस्कार  कट्टर हिंदुत्वादी नेते म्हणून ओळख असलेले सागर बेग यांना प्रदान करण्यात आला आहे.

‘धर्म रक्षक पुरस्कार’
शिवसेनेचे नेते,राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना  महान तपस्वी महायोगी श्री श्री 1008  महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना सागर बेग म्हणाले की,हा पुरस्कार मला  महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हातून मिळाला.त्यामुळे माझी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या कामाची जबाबदारी अजून वाढली आहे.तसेच हा पुरस्कार म्हणजे माझ्या आजवर केलेल्या कामाची पावती आहे,असे मी मानतो.आजवर मी हे काम जितक्या वेगात करत होतो, त्यापेक्षा दुप्पटवेगाने आता मी हे काम करणार आहे.महाराज माझी आपल्याला विनंती आहे की,नुकताच 2006 च्या मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोटाच्या बाबतीत न्यायालयाने सर्व जिहादी आरोपींची सुटका करण्याचा जो दुर्दैवी निर्णय दिला, त्याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी. सुटका झालेल्या 12 आरोपींपैकी 5 जणांना सत्र न्यायालयाने फाशीची तर इतर 7 आरोपींना आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.परंतु उच्च न्यायालयाने मात्र त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहे.ही देशासाठी दुर्भाग्यची गोष्ट आहे.आपल्याकडे हिंदू संघटनानांच्या वतीने ही बाब पंतप्रधान यांच्या कानावर घालन्याची विनंती आम्ही करत आहोत. यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव दत्ता खेमनर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

संबंधित बातम्या

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

Latest News

Trending News