डॉ.आंबेडकर पूर्णकृती पुतळ्याच्या जागेचे रेखांकन करा;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश;आ.ओगले यांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागे संदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हाधिकारी पकंज आशिया यांच्या उपस्थितीत...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागे संदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हाधिकारी पकंज आशिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीने वन आणि भुमिअभिलेख विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना करत डी फॉरेस्ट नोटिफिकेशन नुसार वनविभाग आणि भूमी अभिलेख यांनी जागेवर प्रत्यक्षात पाहणी करुन त्याबाबतचे नकाशे तयार करण्यास सांगितले. तसेच दोन्ही विभागांना पत्र देण्याबाबत उपजिल्हाधिकारी, महसूल विभागालाही आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी आमदार हेमंत ओगले म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णकृति पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून तयार आहे. फक्त वनविभागाच्या ना- हरकत प्रमाणपत्र करीता सदर विषय प्रलंबित राहिला आहे. आता जिल्हाधिकारी यांनीच याबाबत आदेश दिल्यामुळे लवकरच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णकृती पुतळ्याचा प्रश्न  मार्गी लागणार आहे.सदर बैठकीकरिता जिल्हा बँक संचालक करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले,  श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, वन विभाग आणि भूमी अभिलेख विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाध्यक्ष संदिप मगर, दत्तनगरचे सरपंच प्रेमचंद कुंकूलोळ, माजी सरपंच सुनील शिरसाठ, नगरसेवक कलीम कुरेशी, शंकरराव गायकवाड, युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत ओगले, निलेश नागले,अशोक लोंढे, सुहास राठोड, मोहन आव्हाड, सुनील मगर, रितेश एडके, मच्छिंद्र ढोकणे, मनोज काळे, वैभव पंडित, सुरेश ठुबे, किरण खंडागळे, सुरेश बनसोडे, सोमनाथ पटाईत, अतुल काळे, यांच्यासह आदीही उपस्थित होते.

श्रीरामपूर शहरातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागे संदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हाधिकारी पकंज आशिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!