श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्याला बाभळेश्वर आणि नेवासा तालुक्यातून वीज पुरवठा होतो आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना उच्च दाबाने वीजपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात. आता या वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरची
विजेची अडचण कायमची दूर होऊन तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.शेतकऱ्यांना तसेच श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीला यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर येथील एमआयडीसी येथे सुमारे ५९ कोटी ६२ लक्ष रुपयांच्या २२०/३३ के. व्हि उपकेंद्राचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.याप्रसंगी ना.विखे पाटील बोलत होते.या कार्यक्रमास आ.श्री. हेमंत ओगले, मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. सभापती दीपक पटारे,नानासाहेब शिंदे,शदरराव नवले, गिरीधन आसने, संजय फंड,अभिषेक खंडागळे,प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्यासह पारेषण कंपनीचे वरीष्ठ अधिकारी,उद्योजक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ना.राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी ट्रान्समिशन कंपनीच्या वतीने श्रीरामपूर औद्योगिक वसाहत आणि तालुक्यातील गावांना भेडसावणारा वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, म्हणून स्वतंत्र २२०/३३ क्षमतेचे उपकेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या माध्यमातून मंजूर झाले आहे.उपकेंद्रामुळे श्रीरामपूर औद्यगिक वसाहतीमधील उद्योजक, शेतकरी आणि ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.एमआयडीसी मध्ये नव्याने उद्योगधंदे येण्यास त्यामुळे मदतच होईल जेणेकरून तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील.यावेळी आ. हेमंत ओगले म्हणाले की,२२०/३३ के. व्हि उपकेंद्राच्या निर्मितीमुळे श्रीरामपूर विजेच्या बाबतीत समृद्ध होणार असून येणाऱ्या काळात श्रीरामपूर महावितरण कार्यालयाचे विभाजन करून बेलापूर उपकेंद्र मंजूर करावे तसेच महावितरणकडे रिक्त असलेल्या जागा तातडीने भरण्यात याव्यात.
