किल्ल्यांची जागतिक वारसास्थळात नोंद शिवप्रेमींसाठी अभिमानाची घटना-ना.विखे पाटील

श्रीरामपूर-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष असलेल्या बारा किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद होण्याची ऐतिहासिक घटना संपूर्ण देशाला आणि...

श्रीरामपूर-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष असलेल्या बारा किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद होण्याची ऐतिहासिक घटना संपूर्ण देशाला आणि शिवप्रेमीना अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या राज्यातील गड किल्ले ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची खरी साक्ष आहे.जाज्वल्य असा शिवकालीन वारसा या किल्ल्याच्या रुपाने आपल्याला लाभणे हे शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे.
आपल्या राज्यातील शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा साल्वेर लोहगड खांदेरी सुवर्णदूर्ण विजयदूर्ग सिंधूदूर्ग जिंजी हे गड युनोस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित करून एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या इतिहासाचा गौरव असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
विश्वनेते पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून युनेस्को मध्ये वीस देशांनी या किल्ल्याच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद व्हावी म्हणून मतदान केले ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची घटना असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील गड किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने विशेष योजना तयार करून किल्याचे पावित्र्य राखण्यासाठी काम सुरू केले आहे.गड किल्ले ही आपली संस्कृती परंपरा जतन करण्यासाठी शासन स्तरावरून सर्व उपाय योजना केल्या जात असताना आता जागतिक वारसा स्थळांमध्ये या किल्ल्याची नोंद झाल्याने किल्याच्या संरक्षणासाठी आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी आता अधिक वाढली असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा,साल्वेर, लोहगड, खांदेरी,सुवर्णदूर्ण, विजयदूर्ग,सिंधूदूर्ग, जिंजी हे गड युनोस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!