महिलेच्या गळ्याला चाकू लावून सव्वादोन लाखांची लूट;वळदगावला येथील चोरीच्या घटनेने खळबळ

श्रीरामपूर- घरात स्वयंपाक करत असलेल्यामहिलेच्या गळ्याला चाकू लावत तिला खाली पाडून तिच्या गळ्यातील दागिने काढून घेत चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना वळदगाव,...

श्रीरामपूर-

घरात स्वयंपाक करत असलेल्या
महिलेच्या गळ्याला चाकू लावत तिला खाली पाडून तिच्या गळ्यातील दागिने काढून घेत चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना वळदगाव, ता.श्रीरामपूर येथे घडली आहे.
घरात घुसून तिघा जनांनी केलेल्या या जबरी चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत चोरट्यांनी  सव्वातीन लाखाचे दागिने व रोख रक्कम चोरी केली आहे.याबाबत श्रीरामपूर शहर पोलीसात तीन जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मेघा गोरख नवगिरे या पती ,मुलगी व मुलगा यांच्या समवेत वळदगाव येथील गोपाळ वस्ती येथे राहतात. काल शुक्रवार दि. २२ मे रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास मेधा नवगिरे ह्या स्वयंपाक करत होत्या व मुलगा हा जेवण करत होता. तेव्हा अचानक घराच्या मागच्या दाराने एक अनोळखी इसम घरात घुसला.त्याच्या अंगात टि-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट व तोंडाला मास्क लावलेले होते. त्याने घरात येताच नवगिरे यांच्या गळ्याला चाकू लावला व त्यांना खाली पाडून गळ्यातील सोन्याची पोत चाकूने तोडून घेतली. त्यानंतर आणखी दोन इसम अंगात काळ्या रंगाचे टि-शर्ट,काळ्या रंगाच्या पॅन्टी व तोंडाला काळे लावलेले घरात घुसले त्यांनी हत्याराचा धाक दाखवून  घरातील सोने, दागिने काढून दे अन्यथा जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली.त्यानंतर घरातील कपाट व सामानाची उचकापाचक करून दागिने व रोख रक्कम चोरून पलायन केले.रात्री ८ वाजेच्या सुमारास घडलेल्या या चोरीच्या घटनेने परिसरात मोठी घबराट पसरली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!