बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी श्रीरामपूरातील आणखी एका डॉक्टरला बेड्या

श्रीरामपूर-राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भ लिंगनिदान प्रकरणी लोणी पोलीस स्टेशन येथे दाखल असणाऱ्या गुन्ह्यात यापूर्वी एकूण 12...

श्रीरामपूर-
राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भ लिंगनिदान प्रकरणी लोणी पोलीस स्टेशन येथे दाखल असणाऱ्या गुन्ह्यात यापूर्वी एकूण 12 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण दोन डॉक्टर,चार एजंट व सहा संबंधित गर्भवती महिलांचे कुटुंबीय असे एकूण 12 आरोपी अटक करण्यात आले आहेत.गुन्ह्याचा तपास करत असताना असे निष्पन्न झाले की, बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठी लागणाऱ्या गोळ्या या श्रीरामपूर येथील डॉ. राज अजीज शेख हे पुरवत होते. त्यानुसार आज पहाटे  डॉ. राज शेख, वार्ड नंबर 2 यांना अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील  कार्यालयातील पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचे  कबूल केले आहे. त्यानुसार सदरच्या गुन्ह्यामध्ये डॉ. राज अजिज शेख राहणार वार्ड नंबर दोन श्रीरामपूर यास आज पहाटे अटक करण्यात आली आहे.अटक करून त्यांना आज रोजी पोलीस कस्टडी मिळणे कमी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.आजखेरपर्यंत या गुन्ह्यात एकूण 13 आरोपी अटक आहेत. गुन्ह्याचा बारकाईने तपास सुरु आहे. गर्भलिंग निदान केलेल्या महिलांची माहिती घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे.तसेच गर्भलिंग निदाणासाठी बेकायदेशीर पणे मशीन कोठून खरेदी केले, त्यासाठी एजंट कोण त्याचीही माहिती प्राप्त झाली असून  त्यांनाही ताब्यात घेणेकामी पथक रवाना केले असल्याचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!