रहाट पाळण्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा;नगराध्यक्ष ससाणे यांचे मुख्याधिकाऱ्यांना आदेश

श्रीरामपूर-श्रीरामनवमी यात्रेनिमित्त रहाट पाळण्याचा ठेका दिलेल्या ठेकेदारचा धनादेश न वटल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच कारवाईस विलंब केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास...

श्रीरामपूर-
श्रीरामनवमी यात्रेनिमित्त रहाट पाळण्याचा ठेका दिलेल्या ठेकेदारचा धनादेश न वटल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच कारवाईस विलंब केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटिस बजवावी, असा आदेश नगराध्यक्ष करण ससाणे यांनी आज झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना दिला.
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण
सभा पार पडली. उपनगराध्यक्षा कांचन सानप, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व्यासपीठावर उपस्थित होते. सभेत दैनंदिन व आठवडे बाजार वसुलीचा ठेका देण्याच्या विषयावर चर्चा करताना ३२ लाख रुपये ठेक्याची रक्कम निश्चित करण्यात आली होती. दोन तीन वेळा मुदतवाढ देऊनही कोणी ठेका घेतला नाही. त्यामुळे १० टक्के कपात करून ही रकम २८ लाख करण्यास सभेत मंजूरी देण्यात आली. या विषयास अनुसरून नगरसेवक मुजफफर शेख यांनी श्रीरामनवमी यात्रेतील पाळण्याचा ठेका दिलेल्या ठेकेदारकडून किती रक्कम जमा झाली? उर्वरित रक्कम वसुलीसाठी काय प्रयत्न केले ? असे प्रश्न केले असता ५८ लाख रुपयांना सदरचा ठेका देण्यात आला होता. त्यापैकी २८ लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित रकमेचे धनादेश बँकेत वटले नाहीत. संबंधीतास नोटिस पाठवण्यात आली आहे,अशी माहिती दिली.त्यावर चेक वाटले नाही तर गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल करत दिरंगाई करणाऱ्या अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी मुजफ्फर शेख यांनी केली. त्यावर ठेकेदार व अधिकारी यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश नगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिला.श्रीरामनवमी हा गावचा उत्सव आहे, नागरिकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे, पालिकेने याकडे के वळ व्यवसाय म्हणून पाहू नये, या ठेकयाची रक्कम कमी करावी अशी सुचना मुजफ्फर शेख यांनी केली. त्यास सदस्य श्रीनिवास बिहाणी यांनी सहमती दर्शविली. पुढील सभेत विषय पत्रिकेत याचा समावेश करू,असे ससाणे म्हणाले.प्रभाग २ मध्ये आठवडे बाजार भरत असून त्यास पालिकेने परवानगी दिली काय, असा प्रश्न दीपक चव्हाण यांनी केला असता शहरातील आठवडे
बाजार विस्तारत आहे. अनेक रस्त्यांवर तो भरत आहे. व्यापारी, शेतकरी आपला माल घेऊन येतात, त्यांची संख्या निश्चित नसते, असे ससाणे म्हणाले. सभेत संतोष कांबळे, वैशाली चव्हाण, आशा रासकर, स्नेहल खोरे, राजेंद्र पवार यांनी विविध विषयांवर चर्चा केली. दहाव्याच्या ओट्याच्या ठिकाणी वॉचमन नियुक्तीस तसेच बांधकाम विभागाच्या प्राप्त टिपणीतील कंत्राटी कामगारांची थकीत रक्कम देण्यास सभेत मंजूरी देण्यात आली.

कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य
नगरपालिका सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेविका स्नेहल केतन खोरेंनी सत्ताधारी काँग्रेसला धारेवर धरत नगरपालिका कर्मचाऱ्यांना वॉर्ड नंबर २ मध्ये मारहाण झाली तर त्याचा साधा निषेध नगराध्यक्षांसह सत्ताधारी करू शकले नाही,असे सुनावत नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे सभागृहाचे काम असल्याचे मत व्यक्त केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!