श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या ‘भाई व दादा’ यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी आपला दंडुका उगारला आणि पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले.अशाच एका सराईत आरोपीची श्रीरामपूर शहर पोलिसांनी धिंड काढत त्याला शहरभर मिरवले.
याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक 22/3/2026 रोजी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सरफराज बाबा शेख हा बिफ मार्केट, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर या ठिकाणी त्याच्या हातात गावठी कट्टा घेऊन लोकांना धमकावत असून दहशत निर्माण करत होता.त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला. सदर सर्फराज शेख हा ईदगाह मैदान,वार्ड नंबर एक,श्रीरामपूर या ठिकाणी मिळून आला.त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस मिळून आले. सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गु र नंबर 207/2026  शस्त्र (सुधारणा) अधिनियम 2019 चे कलम 3,7, 25, 25(6),(7) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आरोपी सर्फराज बाबा शेख यास अटक करण्यात आली होती.त्यानंतर रात्री उशिरा साबीर शब्बीर कुरेशी हा पोलीस स्टेशनला हजर झाला व त्याने तक्रार दिली की,संध्याकाळी १८.०० वाजताच्या सुमारास तो बिफ मार्केट श्रीरामपूर येथे त्याचे स्विफ्ट कारने जात असताना असताना सरफराज बाबा शेख,इरफान मैनुद्दीन शेख, लुकमान इसाक शहा,राहुल सोनवणे अशांनी त्याची कार अडवून,कोयत्याचा धाक दाखवू, पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली. त्याने खंडणी देण्यास नकार दिला असता इरफान मैनुद्दीन शेख याने त्याचे डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला असता साबीर यांनी तो वार चुकवला.त्यावेळी इतर आरोपींनी ही त्यास मारहाण केली.या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र. नंबर 208/2026 बी.एन.एस कलम 109,189(2),308(2),
126(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात सध्या सर्फराज शेख यास अटक केली आहे व तो पोलीस कस्टडी मध्ये आहे.सर्फराज शेखवर गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल असून नागरिकांमध्ये त्याची दहशत आहे. त्याची दहशत मोडून काढण्यासाठी शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ज्या भागात त्याची दादागिरी आहे त्याच भागात त्याची धिंड आज काढली.पोलिसांच्या या कृतीचे सर्वसामान्य नागरिकांतून स्वागत केले जात आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!