श्रीरामपूर-
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनी देवगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी भाविकांना शब्द दिल्याप्रमाणे भामठाण-कमालपुर-घोगरगाव या रस्त्याच्या कामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे.अहिल्यानगर जिल्ह्याला मराठवाडयाशी जोडणाऱ्या या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनधारक व सरला बेटावर जाणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या रस्त्यासाठी भामाठाण व कमालपुर येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.सदरचा रस्ता हा मोठ्या प्रमाणावर खराब झालेला असून शेतकरी, विद्यार्थी व वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते.आता प्रत्यक्षात काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.सदरचा रस्ता हा अर्धवट स्थितीत बंद पडला होता.पालकमंत्री विखे पाटील यांनी आता नव्याने त्या रस्त्यासाठी निधीची तजवीज करून रस्ता कामातील तांत्रिक अडचणी दूर केल्याने रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.यावेळी गंगाधर बनसोडे, उत्तम बनसोडे,किशोर बनसोडे, रामनाथ सांगळे,रामू बनसोडे,शिवनाथ आव्हाड, मधुकर बनसोडे,पत्रकार नितीन शेळके,पत्रकार संदीप बनसोडे,पत्रकार राजू काझी,ठेकेदार शब्बीर पठाण,विजय बनसोडे,विकास बनसोडे,कैलास मोरे,गणेश मुंजाळ,सुनील बनसोडे, दादा गोरे,गोरख बनसोडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.
