श्रीरामपुरात अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’

श्रीरामपूर- शहराच्या मध्यवर्ती बाजारतळ परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक टाक्यांमध्ये अवैधपणे गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर जिल्हा पुरवठा विभागाने मंगळवारी धाडसी कारवाई केली....

श्रीरामपूर-

शहराच्या मध्यवर्ती बाजारतळ परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक टाक्यांमध्ये अवैधपणे गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर जिल्हा पुरवठा विभागाने मंगळवारी धाडसी कारवाई केली. या छाप्यात ८७,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संशयित आरोपी शोएब दादामिया शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
संगमनेर रोडनजीक एका गाळ्यात अवैध रिफिलिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि. १०) दुपारी १२ च्या सुमारास पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी आरोपी रंगेहाथ पकडला गेला. पथकाने घटनास्थळावरून बी.पी.एल., एच.पी. आणि भारत गॅस कंपन्यांच्या टाक्या, दोन रिफिलिंग मशिन, इलेक्ट्रिक मोटार, नोझल पाईप आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त केले.जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्या आदेशानुसार अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते, निरीक्षण अधिकारी शिवराज पवार, सुदर्शन केदार, राजेंद्र शिंदे, सुहास पुजारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पुरवठा निरीक्षक अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता व अत्यावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याकामी महसूल सहायक योगेश खंडागळे व रुपाली शिंदे यांनी सहकार्य केले.दाट लोकवस्तीत सुरू असलेल्या या धोकादायक व्यवसायावर झालेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

“निवासी भागात अवैध गॅस रिफिलिंग करून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांची आता खैर नाही. आमचे विशेष पथक अशा छुप्या अड्ड्यांचा शोध घेत असून, आढळल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांनी हा इशारा गांभीर्याने घ्यावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.”
राजेंद्र शिंदे (पुरवठा निरीक्षक, श्रीरामपूर)

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!