महिना उलटूनही आरोपींना अटक नाही;श्रीरामपूर शहरात भव्य मोर्चा

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे झालेल्या हिंदु मातंग समाजाच्या निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवुन हत्या करणाऱ्या आरोपींना महिना उलटूनही अटक न झाल्याने...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे झालेल्या हिंदु मातंग समाजाच्या निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवुन हत्या करणाऱ्या आरोपींना महिना उलटूनही अटक न झाल्याने आरोपींना अटक करण्याची मागणी करत शनिवारी दुपारी शहरात भव्य मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मातंग समाज बांधव तसेच हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.
श्रीरामपूर शहरातील भगतसिंग चौकातून या मोर्चाला दुपारी सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवतीर्थ येथे आला. शिवतीर्था समोर विराट मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन तेथे शिवप्रहार प्रतिष्ठान प्रमुख सुरजभाई आगे, विराट प्रतिष्ठानचे प्रदीप सरोदे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हिंदू मातंग बंधू निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवुन हत्या करणारे वाळू तस्कर व त्यांचे साथीदार इतर आरोपींच्या अटकेची मागणी करत फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली. तसेच हत्या करणाऱ्या वाळू तस्कर आरोपींना पाठीशी घालणाऱ्या व पाठबळ देणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्यालाही आरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी मयत निलेश शेंडगे यांच्या मुलीने भावना व्यक्त करत आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली.यावेळी भावना व्यक्त करताना मुलगी भावुक झाल्याने यावेळी महिलांचेही अश्रू अनावर झाले होते.सभेनंतर हजारो मोर्चेकरांच्या उपस्थितीत पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हेही उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!