श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्य व इतर प्रश्न सोडविण्यासाठी त्वरित उपाययोजना करा अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगराध्यक्ष करण ससाणे यांच्याकडे करण्यात आली.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की,
श्रीरामपूर बाजारतळ येथे असलेल्या उद्यानामध्ये नागरिकांच्या व्यायामासाठी साहित्य बसवून संपूर्ण उद्यानाचे नव्याने सुशोभीकरण करून जनतेच्या सुविधासाठी ते खुले करण्यात यावे.शहरातील सर्व नाल्या व गटारी रोजच्या रोज साफसफाई करण्यात यावी. शहरात सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे व तसेच जुने असलेल्या सर्व स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात यावी. शहरातील रस्ते नव्याने करण्यात यावेत व खराब रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावेत.शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.शहरात ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने नव्याने बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था न करणाऱ्या इमारत मालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच ज्यांनी पार्किंगची जागा दाखवून इमारत बांधकाम परवानगी घेतली आहे व प्रत्यक्षात पार्किंगची व्यवस्था केली नाही अशा इमारत बांधकाम मालकावर देखील कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासह अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
सदर निवेदनाची दखल घेऊन उपाययोजना न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपरिषद कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.निवेदन देते प्रसंगी मनसेचे जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर, तालुकाध्यक्ष अमोल साबणे, शराध्यक्ष सतीश कुदळे,नितीन जाधव रोजगार सेना तालुकाध्यक्ष, मनसे श्रीरामपूर तालुका प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल ठोंबरे,आकाश साबळे तालुका संघटक,मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष व तालुका उपाध्यक्ष अरमान शेख, निलेश सोनवणे शहर संघटक, शहर चिटणीस मच्छिंद्र हिंगमिरे,आर्यन शिंदे मनसे शहर उपाध्यक्ष, सुरेश शिंदे, किशोर शिंदे, रवी शिंदे,आदी पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते.
