विस्थापित व्यापाऱ्यांचे त्वरित पुनर्वसन करा;अन्यथा उग्र आंदोलन-त्रिभुवन यांचा इशारा

श्रीरामपूर-विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी श्रीरामपूर नगर परिषदेसमोर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात...

श्रीरामपूर-
विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी श्रीरामपूर नगर परिषदेसमोर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात येऊन मागणीचे निवेदन नगराध्यक्ष करण ससाने यांना देण्यात आले.
त्यावेळी त्रिभुवन म्हणाले की श्रीरामपूर नगर परिषदेने 27 जानेवारी 2025 रोजी अतिक्रमणाच्या नावाखाली नेवासा रोड, बेलापूर रोड, शहर पोलीस स्टेशन समोरील गोंदवणी रोड परिसरातील छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांची दुकाने हटवून त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे.
या कारवाईमुळे अनेक व्यापारी अक्षरशः उघड्यावर आले असून त्यांची उपजीविका बंद पडली आहे. विस्थापित व्यापारी कर्जाच्या खाईत लोटला गेला असून रोजची भाकर कमावणेही कठीण झाले आहे. मुलांचे शिक्षण, घरातील वृद्ध आई-वडिलांचे उपचार, तसेच बँका व फायनान्स कंपन्यांचे कर्ज फेडणे अशक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते व नूतन नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सत्तेत आल्यानंतर विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. आता काँग्रेस पक्षाची सत्ता आली असून दिलेला शब्द पाळून विस्थापित व्यापाऱ्यांचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी समितीने केली आहे. नगराध्यक्ष करण ससाने म्हणाले की विस्थापित व्यापाऱ्यांना लवकरात लवकर न्याय देऊ
विस्थापित व्यापाऱ्यांची गाडी पुन्हा रुळावर यावी यासाठी श्रीरामपूर नगर परिषदेने प्रत्येक व्यापाऱ्याला किमान पाच फूट जागा तातडीने द्यावी व तसा ठराव निवडून आलेले नगराध्यक्ष व नगरसेवकांनी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची दखल घेऊन न्याय दिला गेला नाही, तर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा गंभीर इशाराही सुभाष दादा त्रिभुवन यांनी दिला आहे. त्यावेळी रवी चव्हाण शाहरुख मन्सुरी सुनील दंडवते आसिफ मणियार फयाज पठाण कैलास बाविस्कर जावेद अत्तार श्रीराम निकुंभ  सुमन थोरात कल्पना नरोडे अस्लम शेख दादाभाऊ कोरडे गुलाब गायकवाड शाहिद बागवान बापू सोनवणे नंदा परदेशी मुरलीधर पालवे रवींद्र कोरडे,  सतीश चव्हाण नामदेव पवार विलास चव्हाण राजेंद्र पवार जावेद सय्यद  गोरख बिडवे अशोक जोरवेकर अक्षय गवळी  प्रशांत सूर्यवंशी अन्वरअली जावेद सय्यद भरत नारंग जयमाला उंडे शांताराम बकरे सुरेश चौधरी रंगनाथ उदावंत शरीफ शेख गणेश पालकर अदनान मलिक प्रदीप निकुंभ बेबीताई पालकर सूर्यकांत बावस्कर किशोर राजा मुनीर शेख आधी उपस्थित होते

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!