धुमसते श्रीरामपूर;आरोपी पकडण्यासाठी आलेल्या पुण्याच्या पोलिसांवरच हल्ला;घेराव घातल्याने पोलिसांकडून हवेत गोळीबार

श्रीरामपूर-पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस पथक श्रीरामपूर शहरात एका गुन्ह्यातीलआरोपीच्या शोधात दाखल झाले होते.सदर आरोपीला पकडण्यासाठी पोलीस...

श्रीरामपूर-
पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस पथक श्रीरामपूर शहरात एका गुन्ह्यातील
आरोपीच्या शोधात दाखल झाले होते.सदर आरोपीला पकडण्यासाठी पोलीस शहरातील इराणी गल्ली येथे गेले असता आरोपीच्या समर्थकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक करून पोलीस पथकालाच घेराव घालत त्यांच्यावर हल्ला चढवला.पोलिसांवरील या हल्ल्याने पोलिसांनी तात्काळ स्वसंरक्षणासाठी आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला.गोळीबाराच्या आवाजाने परिसरात मोठा गोंधळ उडाला.गेल्या काही दिवसांपासून शहरातील वातावरण तणावपूर्ण असल्याने नागरिक या आजच्या गोळीबाराच्या घटनेने अजूनच धास्तावले आहेत.आज बुधवार दि.7 रोजी दुपारी ही घटना घडली असून आयात बाबुलाल सय्यद असे संबंधित आरोपीचे नाव आहे.श्रीरामपूर शहर पोलिसांचे एक पथक पुणे पोलिसांच्या मदतीसाठी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.घटनेनंतर आरोपी व त्याच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आयात बाबुलाल सय्यद याच्या शोधासाठी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पथक श्रीरामपूर शहरातील इराणी गल्ली येथे आले. यावेळी पोलीस आल्याचे समजताच आरोपी आयात सय्यद याच्या समर्थकांनी व काही महिलांनी पोलिसांच्या दिशेने  जोरदार दगडफेक करून पोलीस पथकालाच घेराव घालत हल्ला केला. हल्ल्याचे गांभीर्य ओळखून यावेळी पोलीस पथकातील एकाने स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. आरोपीच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी किरण मदने हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान सायंकाळी पुणे पोलिसांनी आरोपी आयात सय्यद याला पकडून ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण आहे. त्यातच आजच्या या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!