राहात्याच्या ‘त्या’ तरुणाचा अनैतिक संबंधातुन खुन; सराईत गुन्हेगारास साथीदारासह अटक;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

श्रीरामपूर-राहता येथील तरुणाचा अनैतिक संबंधाच्या व आर्थीक व्यवहाराच्या कारणावरुन खुन करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी...

श्रीरामपूर-
राहता येथील तरुणाचा अनैतिक संबंधाच्या व आर्थीक व्यवहाराच्या कारणावरुन खुन करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
अपहरण झालेला सचिन कल्याणराव गिधे याच्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल तपास केला असता आरोपी दिपक अंबादास पोकळे याने त्याचे साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर,प्रविण उर्फ पचास वाघमारे,कृष्णा संतोष वाघमारे यांचेसह सचिन गिधे याचा अनैतिक संबंधाच्या व आर्थीक व्यवहाराच्या कारणावरुन खुन करुन त्याचा मृतदेह टायर व डिझेलच्या सहाय्याने जाळून टाकला असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरीता वापरण्यात आलेली १५,००,००० रुपये किमतीची विनानंबरची स्कॉर्पीओ गाडी, ७२,००० रुपये किमतीचे ०३ मोबाईल फोन असा एकुण १५,७२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी दिपक अंबादास पोकळे, वय ३४ वर्षे, रा. लोहारे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याची शिर्डी, राहाता, लोणी, संगमनेर, कोपरगाव परिसरामध्ये त्याची दहशत आहे. त्याच्याविरुध्द मोक्का, खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी अशा प्रकारे गंभीर स्वरुपाचे १७ गुन्हे दाखल आहेत.
१०/१२/२०२५ रोजी सचिन कल्याणराव गिधे रा. हॉलीडे पार्क शेजारी शिर्डी, ता. राहाता, जि.अहिल्यानगर हा साई सुनिता हॉटेल शिर्डी या ठिकाणी गेला होता. त्या दरम्यान फिर्यादी श्रध्दा गिधे हिस आरोपी प्रविण वाघमारे याने फोन करुन ‘सचिन लई माजला आहे, त्याचे हातपाय काढावे लागतील’ अशी धमकी दिली. सचिन गिधे हा परत घरी न आल्याने फिर्यादी श्रध्दा सचिन गिधे हिने दिनांक १५/१२/२०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४५४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) प्रमाणे आरोपी प्रविण उर्फ पचास वाघमारे, दिपक अंबादास पोकळे यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दिनांक १०/१२/२०२५ रोजी गौतम कैलास निकाळे वय २५ वर्षे, रा. राहाता, ता. राहाता, हल्ली रा. सौंदडीबाबा चौक, कालीकानगर, शिर्डी, ता. राहाता जि. अहिल्यानगर यास आरोपी प्रविण वाघमारे उर्फ पचास व त्याचा साथीदार अशांनी त्याच्या घरी जावुन त्यास साकुरी शिव या ठिकाणी जावुन येवु असे म्हणुन त्यास मोटारसायकलवर बसवून नेले. उपासणे बाबा मंदीराच्या पाठीमागे साकुरी, ता. राहाता या ठिकाणी नेवुन त्यास आरोपी प्रविण वाघमारे व त्याचे इतर साथीदारांनी लाथाबुक्क्या व दगडाने मारहाण केली. सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०२७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (२), ११८(१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
आरोपी प्रविण वाघमारे याने व त्याच्या साथीदारांनी एकाच दिवशी दोन गुन्हे केले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि/दिपक मेढे, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, दिपक घाटकर, राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, सुनिल मालणकर, सतिष भवर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड, भगवान धुळे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांच्या पथकाने घटना ठिकाणी भेट देवून सलग १५ दिवस आरोपीची माहिती काढली.सदर गुन्ह्यातील आरोपी दिपक अंबादास पोकळे हा सतत त्याचे राहण्याचे ठिकाणे बदलत असल्याने पथकाने पुणे, नाशिक, खारघर मुंबई, छ. संभाजीनगर, मालेगाव परिसरामध्ये जावुन सदर आरोपी व त्याचे इतर साथीदारांची माहिती काढली. दिनांक ०६/०१/२०२५ रोजी दिपक पोकळे हा त्याच्या साथीदारासह मेंढवण शिवार, संगमनेर परिसरातील दगडाचे खाणीमध्ये लपुन बसलेला असल्याची पथकास गुप्त माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तात्काळ मेंढवण या ठिकाणी जावुन तेथील दगडाचे दगडाचे खाणीस चोहोबाजुनी वेढा घालुन सदर आरोपींना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे दिपक अंबादास पोकळे वय ३४ वर्षे, रा. लोहारे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, गणेश गोरखनाथ दरेकर वय २१ वर्षे, रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक अशी असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!