श्रमसंस्कार शिबिरातून शिस्त,सेवा,नेतृत्वाची शिकवण- माजी आ.मुरकुटे

श्रीरामपूर-अशोक कारखान्याच्या माध्यमातून सुरू केलेल्या शिक्षण संस्थांमधून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घडले असून, आज ते विविध क्षेत्रांत मोठ्या व जबाबदारीच्या पदांवर...

श्रीरामपूर-
अशोक कारखान्याच्या माध्यमातून सुरू केलेल्या शिक्षण संस्थांमधून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घडले असून, आज ते विविध क्षेत्रांत मोठ्या व जबाबदारीच्या पदांवर यशस्वीपणे कार्यरत आहेत.विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार शिबिरातुन व सामुदायिक कार्यातून शिस्त,नेतृत्व,सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्व विकासाची शिकवण मिळते, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन,माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अशोकनगर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उद्‌घाटन गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी गोरक्षनाथ मंदिर खोकर येथे मुरकुटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी खोकर देवस्थानचे ह.भ.प.ओमकार महाराज शिंदे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव सोपानराव राऊत,सहसचिव विरेश गलांडे, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब आदिक, माजी व्हा.चेअरमन बाबासाहेब काळे, संचालक निरज मुरकुटे, शंकरराव शेरकर,मार्केट कमिटी सदस्य राजू चक्रनारायण,पोलीस पाटील डॉ.अनिकेत चव्हाण,खोकर गावच्या सरपंच आशाताई चक्रनारायण,डॉ.तेजश्री तोरणे मॅडम, जगन्नाथ वाघचौरे,भाऊसाहेब सिन्नरकर,ज्ञानदेव सलालकर,विठ्ठलराव  शेरकर, रमेश थोरात,योगेश काळे,रामचंद्र शेरकर,रावसाहेब चक्रनारायण, रविंद्र पटारे,ज्ञानदेव पवार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
  माजी आमदार मुरकुटे पुढे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत मदत केली पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.स्वयंसेवकांमध्ये समाजाबद्दलची जबाबदारीची भावना निर्माण झाली पाहिजे.नेतृत्वगुण, संवाद कौशल्य संघकार्य आणि लोकशाही मूल्यांची शिकवण मिळाली पाहिजे.नैसर्गिक आपत्तींसारख्या परिस्थितीत मदत व पुनर्वसनाचे काम केले पाहिजे.विविध भागातील लोकांशी संवाद साधून राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचे काम स्वयंमसेवकांनी केले पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,स्वयंमशिस्त आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा नेमका काय उद्देश असतो हे त्यांनी सांगितले तर संचालक निरज मुरकुटे यांनी काम करताना विद्यार्थ्यांनी कोणतीही लाज न बाळगता काम केले पाहिजे मी ऑस्ट्रेलियात असतानी माझी सर्व कामे मी स्वतः करत होतो. कामामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीन विकास होतो असे मत त्यांनी व्यक्त केले.ह.भ.प.ओकामर महाराज शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केल ते म्हणाले,विद्यार्थ्यांनी जीवनात प्रामाणिक राहून देश सेवा आणि समाज सेवा केली पाहीजे. मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.दिलीप खंडागळे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.राणी पटारे यांनी केले.कार्यक्रमासाठी
महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.दिलीप खंडागळे,प्रा.संगीता खंडिझोड,उपप्रचार्य सुयोग थोरात,प्रा.सुधीर शेरकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका तसेच कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब पटारे,शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी आणि खोकर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!