रब्बीच्या दोन आवर्तनाचे नियोजन तात्काळ करा;शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष औताडे

श्रीरामपूर-भंडारदरा सिंचन प्रणालीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस, कांदा, गहू ,मका अशा सर्वच बागायती पिकांची लागवड 80 टक्के पूर्ण झालेली आहे.त्यासाठी मोठ्या...

श्रीरामपूर-
भंडारदरा सिंचन प्रणालीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस, कांदा, गहू ,मका अशा सर्वच बागायती पिकांची लागवड 80 टक्के पूर्ण झालेली आहे.त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विहिरी व बोअरचा उपसा सिंचनासाठी होत असल्याने भुजल पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने रब्बी हंगामासाठी दोन आवर्तनांचे नियोजन करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी केली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की,आवर्तन कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांकडून नमुना नंबर 7 चे पाणी अर्ज कालवा निरीक्षकांनी भरून घेण्यासाठी विभागाने सूचना कराव्यात.जलसंपदा विभागाने थकबाकी अभावी कुठल्याही शेतकऱ्यांचे पाणी अर्ज नाकारू नयेत.यावर्षी खरीपामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे तसेच भंडारदरा सिंचन प्रणाली कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची शेती पिके नुकसानीमुळे बाधित झालेले आहेत.श्रीरामपूर तालुक्यातील कॅनॉलच्या चाऱ्यांच्या परिसरातील पाणी पातळी खालावली आहे. मध्यंतरी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी दोन दोन तीन तीन दिवस पिण्याचे आवर्तने घेतल्यामुळे कॅनॉलच्या परिसरातील पाण्याची परिस्थिती पंधरा-वीस दिवस पुढे ढकलण्यासारखी असली तरी कॅनॉल पासून अंतरावर असलेल्या भागांमध्ये पाणी पातळी खालवली आहे.आज रोजी धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा असून  पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून तात्काळ आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत असल्याचे जिल्हाध्यक्ष औताडे यांनी म्हटले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

माळवाडगाव येथे पंचदिवशीय कीर्तन महोत्सवास उत्साहात प्रारंभ

श्रीरामपूर -तालुक्यातील माळवाडगाव येथे धर्मध्वजाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पंचदिवसीय कीर्तन महोत्सवाला भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली. स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कविराज

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

Latest News

Trending News

error: Content is protected !!