विक्रीस बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून 54 हजारांचा मांजा जप्त

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात पोलिसांनी एका दुकानावावर कारवाई करून राज्यात विक्रीस बंदी असलेला 54 हजार रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. या...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात पोलिसांनी एका दुकानावावर कारवाई करून राज्यात विक्रीस बंदी असलेला 54 हजार रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
आज दि. 28 रोजी जिशान अब्दुल गणी शेख, वय 32 वर्ष रा.मौलाना आझाद चौक वार्ड नं 02 हा त्याच्या मौलाना आझाद चौक वार्ड नं. 02 येथील दुकानामध्ये विक्रीस बंदी असलेला नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने सदर ठिकाणी पंचासह छापा टाकला असता तेथे 54 हजार रू. किंमतीचा मोनो व ब्ल्यँक कंपनीच्या नायलॉन मांज्याचे प्रत्येकी 1000 रुपये किंमतीचे 54 नग मिळून आले. आरोपीवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 1116/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 223,125 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, प्लास्टिक किंवा पक्या धाग्यापासुन बनविलेल्या नायलॉन मांज्याच्या विक्रीमुळे पक्षाना, प्राण्याना व मानवी जिवीतास तिव्र इजा होवुन अपराध घडने किंवा जिवीत हानी होवु शकते हि माहीती असताना देखील तसेच मा. जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर निर्णय क्रं. डि.सी. / कार्या 9 व 1/2376/2025 अहिल्यानगर दिनांक 12/12/2025 अन्वये काढलेल्या निर्देशाची अवेज्ञा करुन इतराची जिवीताच्या सुरक्षीतता धोक्यात आननारी कृती करुन नायलॉन मांज्याची विक्री करण्याकरीता दुकानामध्ये, घरामध्ये साठवताना किंवा विक्री करताना कोणी मिळुन आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा डायल 112 वर कॉल करुन माहिती दिल्यास सदर इमसावर तात्काळ गुन्हा दाखल करुन कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. माहिती देण्याऱ्या नागरिकांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोकों/ संभाजी खरात, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/अजित पटारे, पोकों/रामेश्वर तारडे, पोकों/सचिन काकडे, पोकों/सचिन दुकळे यांनी केली.दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों / राजु त्रिभुवन हे करीत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!