बेलापूर ते लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग करा;स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

श्रीरामपूर-बेलापूर ते लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग तयार करून छत्रपती संभाजीनगरला अहिल्यानगरमार्गे पुण्याला जोडण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने...

श्रीरामपूर-
बेलापूर ते लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग तयार करून छत्रपती संभाजीनगरला अहिल्यानगरमार्गे पुण्याला जोडण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
बेलापूर येथील रेल्वे अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे विभागाने नाशिक पुणे-अहिल्यानगर शिर्डी मार्गे रेल्वेमार्ग लोकसभा अधिवेशनात घोषित केला. हा मार्ग अतिशय योग्य असून चाकण ते शिरुर हा संपूर्ण औद्योगिक पट्टा यात जोडला जाणार आहे. या मार्गामध्ये छत्रपती संभाजीनगर मनमाड रेल्वेमार्गावरील एक व्यापारी पेठ असलेल्या लासूर स्टेशन ते बेलापूर हा साधारण ५० किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग सुरु केला. तर महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचे औद्योगिक शहर व आंतरराष्ट्रीय किर्तीचे पर्यटन केंद्र असलेले छत्रपती संभाजीनगर, शहर पुणे तसेच कुंभमेळ्याचे तीर्थक्षेत्र नाशिक ही तिन्ही शहरे एकमेकांना रेल्वेने जोडली जातील.
हा बेलापूर स्टेशन (श्रीरामपूर) ते लासूर स्टेशन लोहमार्ग साधारण ५० किलोमीटरचा असून पैकी ५ किलोमीटर पर्यंत ब्रिटिश कालीन साखर कारखाना बेलापूर शुगर कंपनी पर्यंत रेल्वेमार्ग अस्तित्वात आहे. त्याची फक्त डागडुजी करण्याची करण्याची गरज आहे. या ५ किमी लोहमार्गाचे भूमी अधिग्रहण ही झालेले असून हा रेल्वे मार्ग आपण केल्यास या परिसरातील विकासाला मोठ्याप्रमाणावर चालना मिळेल म्हणून या नगर शिर्डी नाशिक लोहमार्ग करताना बेलापूर स्टेशन ते लासूरस्टेशन या विस्तारित मार्गाची उभारणी करावी.

बेलापूर स्टेशन म्हणजेच श्रीरामपूर शहर हा अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतरचे नवीन जिल्हा मुख्यालय असणार आहे. तसेच बेलापूर रेल्वेस्टेशनकडे मोठी जागा ब्रिटिशांनी अधिग्रहित केलेली आहे. त्यामुळे नवीन भूमी अधिग्रहण करण्याची गरज नाही. तसेच चांदेगाव-नागमठाण येथे गोदावरी नदीचे पात्र खडकाळ असल्याने तेथे रेल्वे पुलासाठी योग्य जागाही उपलब्ध आहे. असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, जितेंद्र भोसले, संतोष जाधव, भरत रामकृष्ण आसने, दत्तात्रय लिप्टे, कॉ. गोविंदराव वाबळे, संदीप गवारे दिलीप गलांडे, किरण ताके, अॅड. प्रमोद बिहाणी, निखिल राजेंद्र, प्रविण चव्हाण, पंकज चव्हाण, अर्जुन साबणे, गणेश ठोंबरे, अनिल रोकडे, अजय गाडेकर, संजय भनगडे, रामदास वाकीर, सुभाष गायकवाड, जयेश निकम आदींच्या सह्या आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!