श्रीरामपूरात वाळू माफियांवर धडक कारवाई;पाच दिवसांत लाखो रुपयांचे साहित्य केले खाक

श्रीरामपूर-तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या पाच...

श्रीरामपूर-
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या पाच दिवसांपासून वाळू माफियांवर धडक कारवाई सुरू केली आहे. या धडक मोहिमेत वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जाळपोळ केली. तर जप्त केलेली वाळू थेट घरकुल लाभार्थ्यांना प्रशासनाने दिली.
श्रीरामपूर तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाने १५ ते १९ डिसेंबर दरम्यान ही मोठी कारवाई केली. गोवर्धनपूर येथे नदीपात्रातील चप्पू शोधण्यासाठी चक्क नगरपालिकेच्या डिझेल बोटीची मदत घेण्यात आली. १८ आणि १९ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १० चप्पू तोडून जाळण्यात आले असून सुमारे अडीच लाख रुपयांची मालमत्ता खाक करण्यात आली आहे.या कारवाई दरम्यान १६ डिसेंबर रोजी नायगाव येथे मोठी कारवाई करत ९० ते ९५ ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला. या ठिकाणी वाळू उपशासाठी वापरली जाणारी १.५ टन वजनाची यारी मशीन, जनरेटर आणि दोन फरांडी जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात १७ डिसेंबर रोजी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारवाई करत जप्त केलेली वाळू खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम प्रशासनाने राबवला आहे.यात खिर्डी येथील १५ ब्रास वाळू ३ घरकुल लाभार्थ्यांना,वांगी बुद्रुक येथील ६ ब्रास वाळू २ लाभार्थ्यांना प्रत्येकी ३ ब्रास प्रमाणे देण्यात आली.तर नायगाव येथील जप्त वाळू देखील लाभार्थ्यांना देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी प्रशांत ओहोळ, ग्राम महसूल अधिकारी अशोक चितळकर, राजेश घोरपडे, राहुल साठे, अजय साळवे, दीपक साळवे, अक्षय जोशी, सुरेंद्र पवार, ऋषिकेश कदम, तुषार आगळे, सृजन कदम, बाळासाहेब कर्जुले, गोविंद खैरनार, गणेश शिंदे, प्रदीप चव्हाण, आकाश गावडे, सायली अमोलिक, महसूल सेवक तुळशीराम शिंदे, संदीप नवसारे तसेच नगरपरिषदचे कर्मचारी अनुप झरेकर, विशाल सोनावणे, मेहबूब शेख,आकाश शिंदे यांसह महसूल आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मोठ्या फौजफाट्याने ही अवैध वाळू उपसा विरोधातील मोहीम फत्ते केली.

कडक कारवाईचा इशारा
“तालुक्यात अवैध गौण खनिज प्रतिबंधात्मक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढेही अवैध उत्खनन किंवा वाहतूक आढळल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ (७) नुसार कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल.”
— मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार, श्रीरामपूर

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!