हिवाळी अधिवेशनात आ.ओगले यांनी चेतवला जिल्ह्याचा मुद्दा;श्रीरामपुर जिल्हा घोषित करण्याची मागणी

श्रीरामपूर-नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हा विभाजनाचा प्रश्न उपस्थित करुन श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा,अशी मागणी आमदार...

श्रीरामपूर-
नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हा विभाजनाचा प्रश्न उपस्थित करुन श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा,अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे.
यावेळी सभागृहात बोलताना आ. ओगले म्हणाले की, अहिल्यानगर हा भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा असून जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक आहे. नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार करता श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे ठिकाण आहे. श्रीरामपूरमध्ये सर्वच महत्त्वाची शासकीय कार्यालय त्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नगररचना कार्यालय असे महत्त्वाचे सर्वच कार्यलय श्रीरामपूर मध्ये आहे. त्याच बरोबर आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी श्रीरामपूर मध्ये आहे तसेच शेती महामंडळाच्या जागा देखिल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही जुनी मागणी आहे. त्यामूळे  श्रीरामपूर हेच जिल्हा मुख्यालयाचे योग्य ठिकाण आसल्याचे ओगले यांनी म्हटले आहे.
      विधानसभेच्या निवडणुकी नंतर पहिल्या दिवसांपासूनच आ. हेमंत ओगले हे श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करत आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या सर्व ठिकाणीं आ. ओगले हे श्रीरामपूर जिल्हाची मागणी करतांना दिसत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!