जिल्हा रुग्णालय दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा;आ.हेमंत ओगले यांनी शासनाचे वेधले लक्ष
श्रीरामपूर-अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रणालीचा पासवर्ड व आयडी चोरून खोटे दिव्यांग प्रमाणपत्र पन्नास हजार रुपये घेऊन खरे दिव्यांग यांना डावलून...
श्रीरामपूर- अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रणालीचा पासवर्ड व आयडी चोरून खोटे दिव्यांग प्रमाणपत्र पन्नास हजार रुपये घेऊन खरे दिव्यांग यांना डावलून चुकीच्या लोकांना प्रमाणपत्र वाटले गेले आहे.या गंभीर प्रकाराची आमदार हेमंत ओगले यांनी नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले आहे. यावर शासनाकडून मंत्री अतुल सावे यांनी उत्तर देताना म्हटले की सदरचा प्रकार हा गंभीर असून, याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासनाचे फसवणूक करून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.यामध्ये अनेकांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा दुरुपयोग करून शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे. या गंभीर विषयाबाबत आमदार हेमंत ओगले यांनी नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुद्दा उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले आहे.
अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाची मागणी
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू झाले आहे. पहिल्या दिवशी आमदार हेमंत ओगले यांनी अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा या आशयाची गांधी टोपी डोक्यात घालून विधान भवनात प्रवेश केला व सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या
श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या
श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी