जिल्हा बँकांनी बेकायदेशीर वसुली केल्यास संघर्ष करू-शेतकरी संघटनेचा इशारा

श्रीरामपूर-अशोक कारखाना कार्यस्थळावर आज दि.५ रोजी सकाळी जिल्हा बँकेचे श्रीरामपूर तालुका विस्तार अधिकारी यांच्यासह तालुक्यातील बँकेचे वसुली अधिकारी व सेवा सहकारी...

श्रीरामपूर-
अशोक कारखाना कार्यस्थळावर आज दि.५ रोजी सकाळी जिल्हा बँकेचे श्रीरामपूर तालुका विस्तार अधिकारी यांच्यासह तालुक्यातील बँकेचे वसुली अधिकारी व सेवा सहकारी सोसायटी यांचे सचिव थकबाकी असलेल्या सेवा सोसायटीतील शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वसुली करण्यासाठी आले होते.परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या वसुली अधिकाऱ्यांना कारखान्यावरून माघारी पाठवून बेकायदेशीर वसुलीचा हा प्रयत्न हाणून पडण्यात आला असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी सांगितले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की,
कारखान्यावर जिल्हा बँकेचे अधिकारी व कर्मचारी ऊस बिलातून कर्ज वसुलीसाठी आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेस मिळाल्यानंतर जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रेय लिपटे, साहेबराव चोरमल, सतीश नाईक, सर्जेराव देवकर, कडू पवार आदी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कारखान्यावर धाव घेतली. त्यावेळी कारखान्यावर कारखान्याचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक कुणीही उपस्थित नव्हते. कारखान्याचे चीफ अकाउंटंट श्री.कुलकर्णी व तालुका विस्तार अधिकारी शिवाजी पवार यांची कारखाना स्थळावर यांची भेट घेऊन त्यांना वसुली बाबत विचारणा केली असता वसुलीबाबत आपणास सहकार विभागाचे कुठले आदेश आहेत का? असा प्रश्न शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी उपस्थित केला. सदर प्रश्नस उत्तर देताना जबाबदार अधिकाऱ्यांनी आम्ही फक्त थकबाकीची माहिती घेण्यासाठी कारखान्यावर आलो आहोत,आम्ही ऊस बिलातून वसुली करणार नाही, असे सांगितले.वास्तविक तालुक्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची सर्व माहिती जिल्हा बँकेकडे अद्यावत असताना अशाप्रकारे बेकायदेशीर वसुली करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार जिल्हा बँकेच्या संचालकांनी सुरू केला होता. सदर प्रकार शेतकरी संघटनेने वसुली अधिकाऱ्यांना कारखान्यावरून माघारी पाठवून हाणून पाडला आहे. 9 ऑक्टोबर 2025 रोजी शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र सरकारने शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती दिलेले असून याबाबत सहकार खात्याने वेळोवेळी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केलेले आहे. तसेच शेतकरी संघटनेने ऊस दराच्या बैठकीत रिजनल डायरेक्टर व जिल्हाधिकारी यांच्या ही सदर बाब निदर्शनास आणून दिली होती. अप्पर जिल्हाधिकारी श्री.हिंगे यांना आठ दिवसापूर्वी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सदर शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणे कामी निवेदन दिले होते.शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांच्या शिष्टमंडळानेही अशोक कारखान्याच्या बेकायदेशीर होत असलेल्या ऊस बिलातील वसुलीस तीव्र विरोध केलेला आहे.तसेच नव्याने सुरू झालेला पंचगंगा कारखाना पंधरा दिवसाच्या आत विनाविलंब पेमेंट करत असून जिल्ह्यातील एकाही कारखान्याने गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरी अद्याप शेतकऱ्यांना ऊस पेमेंट दिलेले नाही,याबाबतही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!