भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनकर यांचा राजीनामा घ्या-तृप्ती देसाई महिला पदाधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारीचा दिला दाखला

श्रीरामपूर:
अहिल्यानगर भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षतील काही पदाधिकारी महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.त्यासोबत महिलांबरोबर नाचत असतानाचा एक व्हिडिओ देखील देसाई यांना महिलांनी पाठवला आहे. याबाबतची माहिती स्वतः तृप्ती देसाई यांनी समाजमाध्यमात दिली आहे.देसाई यांचा तो व्हिडीओ आज मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. त्यात देसाई यांनी म्हटले की भाजप च्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.त्या तक्रारीत या महिलांनी म्हटले की,जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर  हे आम्हाला पक्षात पदे मिळवून देण्याच्या आमिषाने रात्री उशिरापर्यंत धाब्यावर बोलावून घेवून तिथे थांबवणे, दारू पिऊन नाचायला लावणे व पार्ट्या करणे अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार करायला लावत आहेत.तसेच दिनकर यांना असलेल्या पोलीस संरक्षणाचा वापर ते दहशत निर्माण करण्यासाठी करतात.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते जवळचे असल्याने त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याचे धाडस करत नाही.असे धाडस कुणी केलेच तर त्यांच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे काम ते करतात,असे या पदाधिकारी महिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

अहिल्याबाई होळकर यांच्या नावाच्या जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्षच जर महिलांना अशी वागणूक देणार असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेणे गरजेचे आहे.आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करणे सुद्धा गरजेचे आहे,असे या तक्रारीच्या अनुषंगाने तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. या तक्रारीवरून देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सभापती राम शिंदे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करावी अशीही विनंती त्यांना केल्याचे तृप्ती देसाई यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.
दरम्यान या सर्व प्रकाराने अहिल्यानगर जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तृप्ती देसाई महिला पदाधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारीचा दिला दाखला

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News