शहरातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करू-उपमुख्यमंत्री शिंदे;भुयारी गटार योजनेतल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचेही आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणधारकांचा प्रश्न गंभीर आहे. या सर्व अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करून शहराच्या विकासाचा रुतलेला गाडा पुन्हा पूर्ववत करू असे आश्वासन राज्याचे...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणधारकांचा प्रश्न गंभीर आहे. या सर्व अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करून शहराच्या विकासाचा रुतलेला गाडा पुन्हा पूर्ववत करू असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीरामपूर येथे दिले.
श्रीरामपूर शहरातील श्रीराम मंदिर परिसरात आज दि.24 रोजी नगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने आयोजित सभेत उपमुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ते,मा. खा. सदाशिव लोखंडे,मा.आ. भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,राजेंद्र झावरे, सागर बेग, बबन मुठे, अशोक उपाध्ये यांच्यासह विविध पंथांचे महाराज मंडळी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ही निवडणूक श्रीरामपूर चे भविष्य घडवणारी आहे. प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी शहरातील मतदारांना मिळाली आहे.सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणे हाच आमचा प्रमुख अजेंडा आहे.श्रीरामपूर
शहराचे अनेक प्रश्न प्रलंबिल आहेत.येथील रस्त्यांसाठी आपण निधी दिलेला आहे. यापुढेही तो अधिक देऊ. शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करू.इथल्या एमआयडीसीमध्ये विविध प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करू. मागील काळात शहरात भुयारी गटार योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून यातील दोषींना जेलमध्ये टाकू.या निवडणुकीवर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे निवडणूक वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. सर्वांनी डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी. कुणी काही गफलत केली तर ती नक्कीच लपून राहणार नाही. कुणाशीही कसलेही साटेलोटे करू नका.दिवसभर असलेल्या सभांमुळे मला श्रीरामपूर मध्ये येण्यास बराच उशीर झाला. हेलिकॉप्टरची अडचण होती, परंतु इथे आलो नसतो तर वेगवेगळे अर्थ काढले गेले असते.त्यामुळे उशिरा का होईना पण आपल्या लाडक्या बहिनिंचा आशीर्वाद घेण्याकरिता आलो असल्याचे भावनिक उद्गार शिंदे यांनी काढले. शिवसेनेचे श्रीरामपूर नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यावेळी म्हणाले की,शहरातील अतिक्रमण धारकांचा प्रश्न महत्वाचा आहे. सुमारे 2 हजार लोकांचा प्रपंच उध्वस्त झाला आहे. त्यांचे पुनर्वसन हेच आपले ध्येय आहे.शिंदे यांनी अनाथांचा नाथ एकनाथ हे वाक्य श्रीरामपूरात खरे करून दाखवले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव व देवळाली प्रवरा नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवारही उपस्थित होते.यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते.प्रास्तविक बबन मुठे यांनी केले. तर आभार अशोक उपाध्ये यांनी मानले.

‘इलाका किसिका भी हो धमाका हम ही करेंगे’
श्रीरामपूरकरांनी नगरपालिका निवडणूकित शिवसेनेचा भगवा ध्वज नगरपालिकेवर फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना करतानाच ‘इलाका किसिका भी हो, धमाका तो हम ही करेंगे’ असा हिंदी चित्रपटातील डायलॉग मारला.त्यास उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

शहरातील श्रीराम मंदिर परिसरात आयोजित सभेत मार्गदर्शन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.(छाया-अमोल कदम)
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!