शिवसेनेच्या नगरसेवकपदाच्या उमेदवाराची अचानक माघार;प्रभाग १७ मध्ये शिंदे गटावर आपबिती;’प्रभाग ८-अ’ही उमेदवाराविना;शिवसेना दुहेरी धक्क्यात

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस शिवसेना शिंदे गटासाठी अत्यंत धक्कादायक ठरला. प्रभाग १७ मधून अधिकृत उमेदवार प्रमोद...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस शिवसेना शिंदे गटासाठी अत्यंत धक्कादायक ठरला. प्रभाग १७ मधून अधिकृत उमेदवार प्रमोद कुऱ्हे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक माघार घेतली.तर प्रभाग ८-अ मध्ये पक्षाला एकही उमेदवार उभा करता आलेला नाही.
या दोन घटनांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी निवडणूक समीकरणे बदलली आहेत.दरम्यान शिवसेना पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक प्रचार सुरळीत सुरू असतानाच प्रभाग १७ मधील उमेदवार प्रमोद कुर्हे यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्ते आणि नेतृत्व दोन्ही गोंधळून गेले आहे. आंतरकलह, दबावाचे राजकारण आणि स्थानिक जातीय व राजकीय गुंतागुंतीमुळे ही माघार घ्यावी लागल्याच्या चर्चा आहेत.मात्र पक्षाच्या वतीने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

याहून मोठा धक्का म्हणजे प्रभाग ८-अ मध्ये शिवसेनेला उमेदवारच मिळालेला नाही. वारंवार चर्चा, तडजोडी आणि बैठका झाल्या तरी कोणताही मजबूत चेहरा पुढे आला नाही. या घडामोडींमुळे विरोधकांचे पारडे अचानक जड झाले असून, स्वतंत्र उमेदवारांनाही प्रचंड फायदा होण्याची शक्यता वाढली आहे. शहरात प्रभाग १७ मधील माघार आणि प्रभाग ८-अ मधील रिक्त जागा या दोन्ही घटनांनी शिंदे गटाचे संपूर्ण गणित ढवळून निघाले आहे. आगामी काही दिवसांत श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!