श्रीरामपूर-
श्रीरामपुर जिल्हा दुध संघाच्या उभारणीत कर्मचारी व अधिकारी यांचा मोलाचा सहभाग राहीलेला आहे. कामकाज करताना कोणावरही अन्याय केला नाही. दुध धंदा वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा घटक मानुन अनेकांचा सुख – दुःखात सहभागी होता आहे. पंचवीस वर्षापुर्वी दुरावलेल्या कर्मचाऱ्यांची आजच्या स्नेहमेळाव्याला लक्षणीय उपस्थिती पाहुन मन भारावुन गेले आहे,असे प्रतिपादन दुध संघाचे माजी चेअरमन रावसाहेब म्हस्के यांनी दुध कामगार मेळाव्याच्या स्नेहमेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करताना केले. अध्यक्षस्थानी ई.पी.एस.९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे कार्यकारी अध्यक्ष सुभाष पोखरकर होते.
दुग्धयोगी रावसाहेब म्हस्के यांचा सहस्ञचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त अभिष्टचिंतन व कार्मचारी पेन्शन वाढीच्या चळवळीचे मार्गदर्शन होण्यासाठी श्रीरामपुर जिल्हा दुध संघाच्या २५ वर्षापुर्वी विस्थापित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन नुकतेच संघाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकतेच करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात कामगारांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना सत्कारमुर्ती रावसाहेब म्हस्के म्हणाले कि, १९७५ साली सुरु झालेला दुध संघ वाढीसाठी कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यासाठी कामगारांनी दिवस राञ कष्ट केलेले आहेत. कामकाज करताना दुध संघ वाढला पाहीजे, त्यासाठी दुध व्यवसाय वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. स्व. अण्णासाहेब शिंदे यांची धवलक्रांतीची प्रेरणा घेवुन संघाच्या चार तालुक्याच्या कार्यक्षेञात दुग्ध व्यवसाय वाढवला. त्यामुळेच संघाची राज्यात नव्हे तर देशात ओळख निर्माण झाली. राजकारण करताना अनेक प्रलोभन आली माञ नेतृत्वाशी आजपर्यंत गद्दारी केली नाही. नेतृत्वाशी एकनिष्ठ राहील्याने अनेक पदं मिळाली त्याचा वापर जनहीतासाठीच केला. कधीही कुणावर आन्याय केला नाही त्यामुळे प्रेम करणारा मोठा वर्ग आजही सोबतीला आहे. गेली २५ वर्षे कामगार दुरावला आसला तरी आजच्या माझ्या सत्कारासाठी कामगारांची उपस्थिती लक्षणीय आसुन कामगारांच्या या प्रेमाने भारावुन गेलो आहे. यावेळी म्हस्के यांना काही क्षण अश्रु अनावर झाल्याने काहीवेळ सभागृहात निशब्द शांतता पसरली होती.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी कामगारांनी मिळणारी तुटपुंजी पेन्शन वाढुन मिळावी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरु आसुन किमान ७ हजार ५०० व महागाई भत्ता मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा हसुरु असुन लवकरच या मागणीचा सरकारला विचार करावा लागेल असे सांगितले. यावेळी रीपाईचे बाळासाहेब गायकवाड, गोविंद जगताप, शाम राठोड, शिवाजी भोसले, संजय ईनामके, दत्तु हुल्लाळे, आन्वरभाई शेख यांनी मनोगत व्यक्त करताना श्रीरामपुर जिल्हा दुध संघ पुन्हा नव्या दमाने संकलन सुरु करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी आपेक्षा व्यक्त केल्याने उपस्थित कामगारांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेक वर्षे एकदिलाने काम केलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांची तब्बल २५ वर्षानंतर गाठीभेटी झाल्याने एकमेकांची खालीखुशाली जाणुन घेण्यात मग्न झाले होते. अखेर स्नेहभोजनाने या स्नेहमेळाव्याची सांगता झाली. यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन दत्ताञय निर्मळ यांनी केले तर शेवटी आभार शाम दळे यांनी मानले. ह.भ.प. म्हस्के महाराज यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
