भाजप-राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी श्रीनिवास बिहाणी रिंगणात; शिवसेनेची चित्ते तर उबाठाची थोरे यांना उमेदवारी;नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा सस्पेन्स अखेर संपला असून काँग्रेसच्या करण ससाणे यांच्या विरोधात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा सस्पेन्स अखेर संपला असून काँग्रेसच्या करण ससाणे यांच्या विरोधात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांना रिंगणात उतरवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश चित्ते हे तर उबाठा सेनेकडून अशोक थोरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीची आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी औपचारिक घोषणा करण्यात आली.यात भाजप २२ तर राष्ट्रवादी १२ नगरसेवक पदावर निवडणूक लढणार आहे.शिवसेना शिंदे गटाने अखेर महायुतीपासून पूर्णपणे फारकत घेतली आहे.

नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस,भाजप,उबाठा, शिंदे सेना यांच्या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष व बसपाही निवडणूकीच्या रणांगणात उतरले आहेत.
शिंदे सेनेकडून इतर पक्षात उमेदवारी न मिळालेल्यांना शेवटच्या क्षणी आपल्या पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आल्याने त्यांनी सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत.शिंदे सेनेकडून प्रकाश चित्ते आणि दिपाली चित्ते यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या सून मंजूश्री मुरकुटे (प्रभाग ११) यांच्यासह सागर बेग यांच्या समर्थकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
काँग्रेस कडून ससाणे गटाने सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासह नगरसेवकांच्या उमेदवारीची यादी अंतिम केलेली असल्याने त्यांची मोर्चेबांधणी आधीच पूर्ण होती. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये युतीचा ‘फॉर्म्युला’ उशिरा ठरल्याने अनेक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. भाजपने राष्ट्रवादीला मुस्लिम बहुल प्रभागांसह १२ जागा दिल्या. माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्रभाग ३ मधून नगरसेवक पदासाठी अर्ज भरला आहे.

४० वर्षे काही केलं नाही आता काय करणार?-डॉ. विखे पाटील
शिंदे शिवसेनेना सतत आपली भूमिका बदलत राहील्याने आम्ही अखेर त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. श्रीरामपूरला विकासात्मक चेहरा हवा आहे. श्रीरामपूरला यापूर्वी प्रत्येक निवडणुक जातीय समिकरनांवर लढवली गेली.आमचा मात्र कुठल्याही जातिय समिकरणावर विश्वास नाही. ४० वर्षे जे काही करू शकले नाहीत ते आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार होऊन काय करणार? असा सवालही मा.खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.

भाजप–राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवू-आदिक
पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मा खा.डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत युतीची चर्चा पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादीला १२ जागा आणि अध्यक्षपदासह भाजपला २२ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना युतीपासून बाजूला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जावू,असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!