श्रीरामपूर-
श्रीरामपुर शहरातील बेलापुर रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन तीन जणांना गावठी कट्टयासह जेरबंद केले आहे.त्यांच्याकडून 7 लाख 82 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघांविरोधात श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तीन जण हे त्यांच्याकडील कारमधुन गावठी कट्टा विक्री करीता बेलापुर या ठिकाणावरुन श्रीरामपुरकडे येणार आहेत.त्यानुसार त्यांनी पोलीस पथकास तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश दिले.पथकाने मिळालेल्या माहितीचे आधारे श्रीरामपुर ते बेलापुर जाणारे रोडवर अनारसे हॉस्पीटलचे समोर रोडलगत सापळा रचला. काही वेळाने नमूद वाहन येताना दिसले. पथकाने सदर वाहन थांबवुन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे आनंदा यशवंत काळे वय – 44 वर्षे, रा. रेणुकानगर, 51 नं. रेल्वे गेट जवळ, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर, विशाल बबन सोज्वळ वय – 28 वर्षे, रा. रेणुकानगर, दत्तनगर रोड, विश्वकर्मा मंदीराचे पाठीमागे श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर, विजय यशवंत काळे वय – 48 वर्षे, रा. निलकंठ ड्रिमस् शांताई रेसिडेन्सी शेजारी, थत्ते ग्राऊंड, वार्ड नं. 7 श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर अशी असल्याचे सांगितले.त्यांच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता कारच्या डॅशबोर्डचे डिक्कीमध्ये 35,000 रुपये किमतीचा 1 गावठी कट्टा (अग्निशस्त्र), 2000/- रुपये किमतीचे 4 जिवंत काडतुसे,, 7,00,000 रुपये किमतीची होंडा कंपनीची होंडा सिटी कार क्रमांक एम.एच. 03 सी.एस.9466, 45,000/- रुपये किमतीचे 3 मोबाईल असा एकुण 7,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तिन्ही आरोपींना मुद्देमालासह श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करुन त्यांचेविरुध्द पोकॉ/203 रमिझराजा रफिक आतार नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 1010/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.ताब्यात घेण्यात आलेला आरोपी आनंदा यशवंत काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याच्याविरुध्द अनेक गुन्हे दाखल आहेत.
