शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद घालणे नतद्रष्टपणा-पालकमंत्री विखे पाटील;अलघ,डावखर,गुलाटी यांसह अनेकांचा भाजपत प्रवेश

श्रीरामपूर-छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद घालणे हाच नतद्रष्टपणा होता.राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर स्मारक उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर...

श्रीरामपूर-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद घालणे हाच नतद्रष्टपणा होता.राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर स्मारक उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेही भव्य  स्मारक उभे राहील.येत्या सहा महीन्यात विकास प्रक्रीयेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अशोक बॅकेचे माजी चेअरमन नारायणराव डावखर, पहील्या माजी नगराध्यक्षा इंदूमती डावखर,गजेंद्र डावखर, रवि गुलाटी, हेमा गुलाटी,राजेश अलग यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे  सर्वाचे स्वागत करून अभिनंदन केले.भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,दिलीप भालसिंग,दिपक पटारे,संजय फंड,आशिष धनवटे श्रीनिवास बिहाणी जितेंद्र छाजेड बाबासाहेब चेडे केतन खोरे रवी पाटील स्वाती चव्हाण पुष्पाताई हरदास शरद नवले नानासाहेब शिंदे गिरीधर आसने आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,पक्ष संघटनेला महत्व आहे.सर्वाच्या पाठीशी पक्षाची ताकद असल्यामुळे प्रतयेकजण इथे मोठा आहे.व्यक्तिला  नाही तर  संघटनेला महत्व असल्याचे सांगून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वाच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की चाळीस वर्षे लागली.मात्र महायुती सरकार आल्यामुळे स्मारकाचे स्वप्न पूर्ण होवू शकले.अनेक वर्ष फक्त जागेवरून वाद झाले.महाराजांच्या स्मारकावरून वाद होणे हाच  नतद्रष्ट पणा असल्याचा उल्लेख केला.

श्रीरामपूर शहारातील नाॅर्दनब्रॅच कालव्याचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले असून येत्या सहा महीन्यात विकासाच्या माध्यामातून शहराचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.भाररत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी यापुर्वीच मंजूर झाला असून भव्य स्मारक लवकर उभे राहील.
दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदी मराठी गाण्याची मैफल आयोजित करण्यात आली होती.यातील काही कलाकार संगमनेचे असल्याचा उल्लेख करून संगमनेरात फार चांगले कलाकार असल्याचा मिश्कील टिपणी करून  स्नेहमिलन कार्यक्रमात आज मिसळ संगमनेरची आणि पाव लोणीचे असल्याचे उल्लेख केला.कार्यक्रमास शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते विविध संस्थां संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक आजी माजी नगरसेवकांनी भाजपत जाहीर प्रवेश केला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!