ई केवायसी बंद असल्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित-जवरे

श्रीरामपूर-संपूर्ण राज्यभरात नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचे संपूर्णतः शेत पिकाचे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी मदत जाहीर केली आहे. परंतु...

श्रीरामपूर-
संपूर्ण राज्यभरात नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचे संपूर्णतः शेत पिकाचे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी मदत जाहीर केली आहे. परंतु पंचनामासाठी लागणारी ई केवायसी प्रणाली बंद असल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहे तरी शासनाने तात्काळ ई केवायसी सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
चालू खरीप हंगामामध्ये परतीच्या मान्सूनने अतिरिक्त पर्जन्यवृष्टी झाल्याने खरीप हंगामाचे पूर्णपणे नुकसान झाले होते शासनाने नुकसान भरपाई म्हणून 31 हजार 628 कोटी मदतीसाठी आढावा म्हणून तात्काळ मदत शेतकऱ्यांना जाहीर केली होती दिवाळीपर्यंत काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत ही मिळाली परंतु त्यानंतर शासनाने पंचनामेसाठी इ केवायसी प्रणाली अट असल्यामुळे शासनाच्या वेबसाईटवरील इ केवायसी प्रणाली बंद असल्यामुळे संबंधित तहसील कार्यालयाकडून पंचनामे केले गेल्याच्या याद्या पुन्हा तलाठी कार्यालयांकडे माघारी पाठवण्यात आले आहे
नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पिकाला शासनाने सर्वप्रथम दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यासाठी शासन आदेश काढले होते त्यामध्ये वाढ करून मर्यादा तीन हेक्टर पर्यंत करण्यात आली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची दोन किंवा तीन वेगवेगळ्या गावांमध्ये जमीन असल्याने, आधार क्रमांक एकच असल्याने, इकेवायसी अपूर्ण , असल्याने आधार क्रमांक चुकीचा असल्याने, अशा वेगवेगळ्या त्रुटी दाखवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शासनाने पंचनामाचे प्रस्ताव पुन्हा माघारी तलाठी कार्यालयांकडे पाठवले असल्यानेशेतकरी मदतीपासून वंचित आहे त्यामुळे शेतकऱ्यांना  तात्काळ मदत मिळावी म्हणून शासन स्तरावर त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे शिवाजी जवरे , राजेंद्र उंडे, एडवोकेट सर्जेराव घोडे, किसन काकडे , साहेबराव चोरमल , शरद पवार राजेंद्र गोरे , बबनराव उघडे, ईश्वर दरंदले, शरद पठारे, ज्ञानदेव पठारे, आदींनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!