छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण ऐतिहसिक सोहळा ठरणार -डाॅ.विखे पाटील

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारकाचे लोकार्पण रविवारी संपन्न होत असून,श्रीरामपूरकर नागरीकांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा ऐतिहासिक सोहळ्यास शिवप्रेमी...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती भागात  उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारकाचे लोकार्पण रविवारी संपन्न होत असून,श्रीरामपूरकर नागरीकांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा ऐतिहासिक  सोहळ्यास शिवप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन डाॅ सुजय विखे पाटील यांनी केले. संगमनेर–श्रीरामपूर–नेवासा मार्गावरील भाजी मंडई समोर उभारण्यात आला असून, श्रीरामपूरकरांच्या मनामनात नवचैतन्य निर्माण करणारा आणि शिवचरित्राची प्रेरणा देणारे  स्मारक असल्याचे विखे पाटील म्हणाले.या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन रविवार दि.२ नोव्हेबर २०२५ रोजी दुपारी ४वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्णजी विखे पाटील भूषवणार आहेत.या प्रसंगी शहरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रम, शौर्य आणि लोकसेवेच्या प्रेरणेतून उभारलेला हा पुतळा श्रीरामपूरच्या इतिहासात अभिमानाचा आणि प्रेरणेचा नवा अध्याय ठरणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रत्येक पिढीला राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि लोकसेवेची दिशा मिळते. श्रीरामपूरसारख्या ऐतिहासिक शहरात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणे हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या स्मारकामुळे भावी पिढ्यांना इतिहासाची प्रेरणा मिळत राहील.”या लोकार्पण सोहळ्यासाठी समस्त शिवप्रेमी श्रीरामपूरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन  डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

श्रीरामपूर शहरात सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!