अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली श्रीरामपूर उद्वध्वस्त करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल-आ.ओगले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहर हे एका कुटुंबाप्रमाणे एकत्रित वावरत होते परंतु काहींना ते देखवले गेले नाही.त्यांनी श्रीरामपूरच्या बाजारपेठेवरच हल्ला चढवत अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहर हे एका कुटुंबाप्रमाणे एकत्रित वावरत होते परंतु काहींना ते देखवले गेले नाही.त्यांनी श्रीरामपूरच्या बाजारपेठेवरच हल्ला चढवत अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली बाजारपेठ उद्धवस्त केली.अशा लोकांना श्रीरामपूरची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले.आमदार हेमंत ओगले यांच्या स्थानिक विकास निधीतून श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.यावेळी करण ससाणे म्हणाले की, आ. ओगले यांच्या पहिल्याच वर्षाच्या आमदार निधी मधून श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे संपन्न होत आहेत, नागरिकांच्या हिताच्या कामाला प्राधान्य दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, काही विघ्नसंतोषी लोक श्रीरामपूरला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे, जे गाव स्व. जयंतराव ससाणे यांनी तळ हाताच्या फोडा सारखे जपले आहे. त्यामुळे जनता सुज्ञ आहे. आ.ओगले यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर  निधी दिल्याने महत्वपूर्ण कामे मार्गी लागल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी सभापती बाबासाहेब दिघे , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे,  सभापती सुधीर नवले, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, मुजफ्फर शेख, उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे,  दिलिप नागरे, दत्तात्रेय सानप, नगरसेवक शामलिंग शिंदे, भरत कुंकुलोळ,प्रणिती दीपक चव्हाण, अशोक बागुल, शहराध्यक्ष लकी सेठी, पंडीत बोंबले, के सी शेळके, मुन्ना पठाण, रितेश रोटे, निखिल पवार, तिलक डूगरवाल, अरुण मंडलिक, रवी खीलारी, प्रसाद चौधरी, दिपक वमने, शहीद कुरेशी, रितेश एडके, सुरेश ठुबे, भाग्यश लोखंडे, प्रवीण कोठावळे, सुभाष पोटे, प्रवीण नवले,  प्रशांत उचित, पाशा शिवरकर, डॉ. मच्छिंद्र त्रिभुवन, सुनील साबळे, रोहित शिंदे, डॉ. वैभव पंडीत, अतुल शेटे यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!