श्रीरामपूर-
मुठेवाडगाव येथे शासनाचा दलितवस्ती सुधार योजनेचा निधि बऱ्याच दिवसापासून मंजूर होत नव्हता. त्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर लागलीच पालकमंत्री विखे पाटील यांनी दलित वस्ती योजनेचा निधी मंजूर केला. त्यापैकी मुठेवाडगाव-वडळामहादेव रस्ता तेथे खडीकरण व मुरमीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्याची दुरावस्था झालेली होती.रस्त्याच्या दुरुस्ती शुभारंभप्रसंगी मा.सरपंच शिवाजीराव मुठे, शिवसेना तालुका उपप्रमुख लक्ष्मण पाचपिंड, ग्रामपंचायत सददस्य किशोर साठे, सुभाषराव रंगनाथ मुठे,ओम इलेट्रॉनिक्सचे मारुतराव जासुद, विश्वासराव शिरसागर,गोरखराव तरकसे,भास्कर गंगाधर मुठे,मयूर महाराज मुठे,भाजप युवा मोर्चोंचे तालुका पदाधिकारी रोहित चांगदेव मुठे व डॉ.शंकरराव मुठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.दलित वस्ती निधीसाठी भाजप नेते डॉ. शंकरराव मुठे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागणी मान्य करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
