नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे-पालकमंत्री विखे पाटील

श्रीरामपूर-यंदाच्या दिपावली सणावर नैसर्गिक संकटाच सावट असले तरी,या मंगलमय पर्वात नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहीले...

श्रीरामपूर-
यंदाच्या दिपावली सणावर नैसर्गिक संकटाच सावट असले तरी,या  मंगलमय पर्वात  नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहीले आहे. महायुती सरकार प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील शेतकर्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचे समाधान व्यक्त करून  जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वाना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनी विखे पाटील यांच्या शुभहस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले.माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आण्णासाहेब भोसले, डॉ.भास्करराव खर्डे, कैलास तांबे, शिवाजीराव जोंधळे, पोपटराव वाणी, किशोर नावंदर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्यासह सर्व संचालक प्राचार्य उपस्थित होते.पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या मुख्य कार्यालयात चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील आणि सौ.धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. ना.राधाकृष्ण विखे पाटील, सौ.शालीनीताई विखे पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन सोपानराव शिरसाठ, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांच्या कुटूबियांनी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, यंदाच्या वर्षी नैसर्गिक संकटाचे सावट असले तरी, शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकार खंबीरपणे उभे राहीले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राज्याला नैसर्गिक संकटात मदत करण्याचा निर्णय घेतला त्याचे आपण स्वागत करतो. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लोणी येथील भेटी प्रसंगी राज्याला मदत करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याचे  मंत्री विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने नैसर्गिक संकटात शेतकर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेवून ३ हजार २०० कोटी रुपयांच्या पॅकेजची केवळ घोषणा केली नाही तर, त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. राज्य सरकारने  अन्य पायाभूत सुविधा करीताही ३२ हजार कोटी रुपयांची मदत देण्याचे नियोजनही केले असल्याचे त्यांनी सांगितले.अहील्यानगर जिल्ह्यातील  शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या
निर्णयाचा लाभ झाला असून, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. प्रशासनाने अधिका-यांनी सतर्कपणे केलेल्या कार्यवाही बद्दल मंत्री विखे पाटील यांनी समाधान व्यक्त करून प्रशासनाच्या सहकार्याने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे वर्ग होवू शकले.ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. परंतू या परीस्थितीवर मात करून आमचा शेतकरी बांधव पुन्हा नव्या उमेदीने उभा राहील आशी अपेक्षा व्यक्त करून, दिपावलीचे मंगल पर्व नवा आशेचा किरण घेवून येणारे असते. संकटावर मात करून नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी हा दिपोत्सव निश्चित सर्वांना बळ देईल.
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी वस्तु सेवाकर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय करून देशातील जनतेला दिलासा दिला. या निर्णयाचा सकारात्मक परीणाम दिवाळी सणात अर्थव्यवस्थेवर झाला. सण उत्सवाच्या निमित्ताने स्थानिक विक्रेत्यांकडून वस्तु खरेदी करण्याच्या त्यांच्या आवाहनाला समाज घटकांनी दिलेला प्रतिसादही बाजारपेठांमध्ये पाहायला मिळाला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!