डॉ.आंबेडकर स्मारकाच्या कामाला गती द्या;आ.ओगले यांच्या प्रशासनाला सूचना;भीमसैनिकांच्या उपोषणाला यश

श्रीरामपूर-येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा बसविण्यासाठी आवश्यक ते सर्व परवानगी व कागदपत्राची पूर्तता करून सुद्धा काम चालू होत...

श्रीरामपूर-
येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा बसविण्यासाठी आवश्यक ते सर्व परवानगी व कागदपत्राची पूर्तता करून सुद्धा काम चालू होत नसल्याने पुतळ्याचे काम चालू व्हावे यासाठी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष  संदीप मगर, सुनिल मगर,आंबादास निकाळजे, सुनील संसारे,महेंद्र त्रिभुवन,मचिद ढोकणे,अनिल माघाडे, सचिन राठोड, सोमनाथ पटाईत यांच्यासह अनेक भीमसैनिकांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला यश आले आहे.लवकरच श्रीरामपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा साकार होणार आहे.याकरिता प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करून कामाला गती देण्याच्या सूचना आ. हेमंत ओगले यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना केल्या आहेत. भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा हा तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या दूरदृष्टीतून तयार झालेला आहे. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे स्मारकाचे काम थांबले होते. विधानसभेच्या निकालानंतर लगेचच आमदार हेमंत ओगले व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून आवश्यकता लागणाऱ्या सर्व विभागांच्या परवानग्या नगरपरिषद कार्यालयाला मिळवून दिल्या आहेत. आता फक्त प्रशासकीय कामकाज बाकी असून ते तातडीने मार्गी लावून सदर भव्य दिव्य स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे अशा सूचना आमदार ओगले यांनी नगरपरिषदेच्या प्रशासनाला केल्या आहेत.यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाने,  जिल्हा काँग्रेसचे कार्य अध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यासह प्रशांत भोसले रितेश एडके सनी बारसे बाळू आवारे विजया बारसे रोहिणी बनसोडे कुणाल वाहुळ  तुषार वाहुळ अशोक लोंढे किरण खंडागळे राधाकिसन वाघमारे अशोक पवार विश्वास भोसले संतोष केदारे किशोर सरनागते करण कांबळे संदीप कसबे किरण कसबे प्रशांत नरवडे केसरबाई जावळे सुमनबाई दुशिंग वंदना पठारे प्रभाताई पवार तन्वीर शेख सुरज गायकवाड सोमनाथ गांगुर्डे लखन आवड शिवाजी त्रिभुवन राहुल जाधव विलास जाधव निलेश निगालसह महिला उपोषण स्थळी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!