गुंगीच्या नशेच्या गोळ्या विक्रीकरीता आलेल्या सराईत आरोपीला बेड्या;पोलिसांकडून 24 हजारांचा मुद्देमाल जप्त;श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गुंगीच्या नशेच्या नायट्रोझेपम नावाच्या गोळ्या विक्रीकरीता आलेल्या भुसावळ येथील एका सराईत आरोपीला श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्या...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात गुंगीच्या नशेच्या नायट्रोझेपम नावाच्या गोळ्या विक्रीकरीता आलेल्या भुसावळ येथील एका सराईत आरोपीला श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 24,026 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.काल्या ऊर्फ तस्लीम सलीम शेख, वय 30 वर्षे, रा. नाहटा कॉलेज जवळ, इंदिरानगर ता. भुसावळ जि. जळगाव असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 17/10/2025 रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बस स्टॅण्ड परिसर वॉर्ड नं.05 श्रीरामपूर येथे फुल्याफुल्याचा शर्ट घातलेला एक संशयीत इसम हा गुंगीकारक नशेच्या गोळया विक्री करण्याकरीता आलेला आहे.देशमुख यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांना याबाबत कळवुन त्यांच्या परवानगीने तसेच औषध निरीक्षक सोमनाथ बा. मुळे यांच्याशी संर्पक करुन तात्काळ एका तपास पथकास बस स्टॅण्ड परिसरात जावुन सदर इसमाचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले.तपास पथकाने तात्काळ बस स्टॅण्ड परिसरात जावुन नमुद वर्णनाच्या संशयीत इसमाचा शोध घेतला असता बस स्टॅण्डच्या भिंतीच्या आडोशाला शौचालयासमोर फुल्याफुल्याचा शर्ट घातलेला एक इसम संशयीतरित्या एक कापडी पिशवी हातामध्ये घेवुन फिरताना पोलीस पथकाला दिसला. तेव्हा त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव काल्या ऊर्फ तस्लीम सलीम शेख, वय 30 वर्षे, रा. नाहटा कॉलेज जवळ, इंदिरानगर ता. भुसावळ जि. जळगाव असे असल्याचे सांगितले. त्यास हातातील पिशवीमध्ये काय आहे असे विचारले असता त्याने सदरच्या पिशवीमध्ये गुंगीकारक नशा आणणाऱ्या नायट्राझेपमच्या गोळया असुन त्या मी विक्रीसाठी आणलेल्या आहेत असे सांगितले. तेव्हा त्याला सदर गोळयाच्या विक्रीबाबत परवाना किंवा वैदयकीय अधिकारी यांची संदर्भचिठ्ठी आहे का, असे विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्याच्या हातातील पिशवीची व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1026/- रु. किंमतीच्या नायट्राझेपम (Nitrazepam Tablets IP) गोळयाचे एकुण 19 पाकिटे त्यामध्ये प्रत्येकी 10 गोळया असलेले व एक पाकिटाची छापील किंमत 54 रु. असलेले तसेच 23,000 रु. रोख रक्कम असा एकूण 24,026 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 928/2025 भारतीय न्याय संहिता कलम 123, 125,278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यास अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोहेकों/प्रसाद साळवे, पोना/संदीप दरदंले, पोकों / अजित पटारे, पोकों / मच्छिंद्र कातखडे, पोकों/संभाजी खरात, पोकों/सचिन दुकळे, पोकों/आजिनाथ आंधळे, पोकों/ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे हे करीत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!