डॉ.आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासाठी वनविभागाचा ‘ना हरकत’ दाखला प्राप्त*स्मारक समितीच्या वतीने मा.खा.सुजय विखे यांच्या अभिनंदनचा ठराव

श्रीरामपूर –महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी वनविभागाची ‘ना हरकत दाखला’ (NOC) अखेर प्राप्त झाली आहे. ही परवानगी...

श्रीरामपूर –
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी वनविभागाची ‘ना हरकत दाखला’ (NOC) अखेर प्राप्त झाली आहे. ही परवानगी मिळाल्यामुळे श्रीरामपूर रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळावर स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.या ऐतिहासिक यशाचा जल्लोष निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे पेढे वाटून सर्व भीमअनुयायांनी आनंदोत्सव साजरा केला.
या यशामध्ये माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे विशेष योगदान असल्याने त्यांचा अभिनंदनचा ठराव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी मांडला.तो सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर केला.यावेळी सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की,आता लवकरच भीम अनुयायांचे स्वप्न साकार होणार आहे. भव्य दिव्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक श्रीरामपुरात उभे राहील. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी कामाचा शुभारंभ दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. लवकरच या सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.यावेळी राजू नाना गायकवाड ,विजय पवार, रमाताई धीवर संजय रूपटक्के, संजय बोरगे, विशाल सुरडकर, प्रकाश ढोकणे, अमोल साबणे,दादासाहेब बनकर, डॉ. राजीव साळवे,संजय रूपटक्के, दादासाहेब बनकर,बाळासाहेब बागुल, अल्ताफभाई शेख,विठ्ठल गालफाडे, अमोल मिसाळ, रॉकी लोंढे, किशोर अभंग, अशोक बागुल, गोरख आढाव, सुरेश शेळके, किशोर फाजगे, ॲड मिलिंद धीवर,कल्पनाताई तेलोरे, वंदनाताई गायकवाड, उज्वलाताई येवलेकर, संगीताताई साळवे,कारभारी त्रिभुवन आदी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!