श्रीरामपूर बसस्थानकाचे काम १ नोव्हेंबरपर्यंत चालू करा;परिवहन मंत्री सरनाईक यांचे आदेश; आ.ओगले यांची माहिती

श्रीरामपूर-श्रीरामपूर येथील एसटी महामंडळाची जमीन ही शासनाची असून यासंबंधी ७/१२ आणि ८ अ वर काही नोंदी राहिलेल्या असतील तर त्या १...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर येथील एसटी महामंडळाची जमीन ही शासनाची असून यासंबंधी ७/१२ आणि ८ अ वर काही नोंदी राहिलेल्या असतील तर त्या १ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करून एस टी महामंडळाच्या बस स्टॅन्ड चे काम तातडीने चालू करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत,अशी माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली.श्रीरामपूर येथील बस स्टँडच्या रखडलेल्या कामाबाबत तसेच काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सदर जागेचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने आ. ओगले यांनी तातडीने परिवहन मंत्री सरनाईक यांना पत्र लिहून बैठकीचे आयोजन करण्याचे विनंती केली होती. त्या अनुषंगाने आज मंत्रालय येथे परिवहन मंत्री सरनाईक यांच्या दालनामध्ये सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस राज्य महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक, जिल्हा भुमी अभिलेख अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यासह सदर कामाचे ठेकेदार उपस्थित होते. बैठकीमध्ये आमदार ओगले यांनी मंत्री सरनाईक यांना निदर्शनास आणून दिले की श्रीरामपूर येथे बस स्टँडचे काम मंजूर असून परंतु जागेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे सदरचे काम रखडले आहे याचाच फायदा घेऊन काही गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनी तेथे ताबा मारण्याचा प्रयत्न केला. त्यावर मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा भुमिलेख अधिकारी यांना तातडीने सदर जागेच्या संदर्भातील उताऱ्यांवर शासनाच्या नोंदी करण्याचे आदेश दिले.एक नोव्हेंबर पर्यंत सदर कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देखील संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच श्रीरामपूर येथील बस स्टॅन्ड चे पुनर्बांधणीचे काम चालू होणार आहे. तसेच सदर कामात कुणी अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मंत्री महोदयांनी दिल्या आहेत.

श्रीरामपूर बस स्टँड बाबत मंत्रालयात परिवहन मंत्री सरनाईक यांच्या दालनामध्ये आ. हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!