श्रीरामपूर-
तालुक्यात जन्म-मृत्यू नोंदी, सरकारी शाळा आणि इतर शासकीय कार्यालय मिळून सुमारे ७५०० कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत.त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील मराठा समाजातील नागरिकांना रीतसर शासकीय नोंदी उपलब्ध असल्यामुळे कुणबी दाखले मिळण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे मत प्रमाणित मोडी लिपी वाचक ॲड.शुभम शामराव फरगडे यांनी व्यक्त केले आहे.अखंड मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कुणबी दाखला,जात पडताळणी व हैदराबाद गॅझेट,सातारा गॅझेट संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन करताना ॲड,फरगडे यांनी सांगितले. यावेळी त्यांचे सहकारी मयूर पांडागळे व ललित आरगडे उपस्थित होते. यावेळी माहिती देताना त्यांनी पुढे सांगितले की,पूर्वीच्या काळात श्रीरामपूर तालुका अस्तित्वात नसल्याने सध्या श्रीरामपूर मध्ये असणाऱ्या बहुतेक गावातील व्यक्तींच्या नोंदी या नेवासा,राहुरी व कोपरगाव तालुका दुय्यम निबंधक कार्यालयात सापडलेल्या आहेत.तसेच आपल्या हिंदू धर्मातील परंपरेनुसार बहुतेक मुलांचे जन्म हे त्याकाळात मामाचे गावी झालेले आहेत.त्यामुळे तालुक्यातील काही व्यक्तींच्या नोंदी परगावात जन्म झाल्यामुळे इतर तालुक्यातील गावांमध्ये सापडतात.
यासर्व नोंदींचे योग्य वर्गीकरण आणि एकत्रीकरण केल्यास तालुक्यातील बहुतांश बांधवांना कुणबी दाखले मिळतील आणि त्याची कायदेशीर पडताळणी देखील होईल असे सांगितले.ॲड,शुभम फरगडे म्हणाले की,सुदैवाने आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील असंख्य नोंदी सापडलेल्या आहेत.परंतु सुमारे १२५ वर्षे उलटून गेल्यामुळे हा कागद जीर्ण होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे भविष्याचे दृष्टीने या नोंदींचे योग्य जतन होणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रत्येक गावातील बांधवांनी एकत्र येऊन सदर जुन्या जीर्ण झालेल्या नोंदीचे लॅमिनेशन करणे गरजेचे आहे.गेल्या दोन वर्षामध्ये कुणबी दाखल्याचे आधारे आपल्या असंख्य विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत मिळाल्याने त्यांना शिक्षण घेणे शक्य झाले असून यापुढे देखील हा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार होणार असल्याचे सांगितले.त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटचा पूर्वी मराठवाड्यात असलेल्या म्हंकाळवाडगाव,भामाठाण, सरला,गोवर्धन या गावांना फायदा होणार आहे.तसेच आकारी पडीत शेतकऱ्यांच्या नऊ गावातील शासकीय नोंदी सापडलेल्या असल्याने त्यांनाही कुणबी दाखले मिळण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.श्रीरामपूर तालुक्यातील कुणबी दाखले काढताना प्रांताधिकारी किरण सावंत पाटील,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कोणतीही अडवणूक न करता रीतसर नोंदी असलेले दाखले काढण्यास चांगले सहकार्य लाभत असल्याचेही ॲड,फरगडे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी उंदीरगाव,बेलापूर बुद्रुक,भैरवनाथनगर,मातापुर या गावातील बांधवांनी जीर्ण झालेल्या नोंदीचे लॅमिनेशन स्वखर्चाने करून देण्याची जबाबदारी घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश कांगुणे यांनी केले तर स्वागत अमोल बोंबले,पाहुण्यांचा परिचय सुधाकर बोंबले व आभार ऋषिकेश मोरगे यांनी मानले.यावेळी नागेशभाई सावंत व राजेंद्र मोरगे यांनी अखंड मराठा समाज श्रीरामपूरने आजपर्यंत केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासह इतर सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
त्याचबरोबर समाजासाठी आयोजित केलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमांना सर्वांचा मोठा सहभाग असणे गरजेचे असल्याचे प्रास्ताविकात सांगितले.
ॲड,बाळासाहेब आगे म्हणाले की,आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने अखंड मराठा समाजाने विविध सामाजिक उपक्रम राबवून जमा खर्च प्रसिद्ध करून पारदर्शक कार्य केले आहे.यावेळी जेष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब डावखर, शिवाजीराव भोसले,प्रवीण
फरगडे,निलेश जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी रोहन डावखर, विशाल धनवटे,गोकुळ गायकवाड,सचिन बोंबले,शामराव फरगडे,सचिन जगताप,बद्रीनाथ उंडे,अनिल भनगडे,सुभाष फरगडे,रवींद्र कांबळे,मच्छिंद्र आव्हाड,पोपटराव फरगडे,दिनकर यादव,डॉ.विश्वास वहाडणे, रमेश आव्हाड,कुणाल बनकर,दिपक डावखर,रमेश कालंगडे,रवींद्र कांबळे,संदीप बनसोडे,बाबासाहेब थोरात, फकिरचंद चौधरी,प्रसाद हुरे, राजेश धुमाळ,शिवाजी ताके, ज्ञानदेव सुसरे,स्वप्निल जाधव,नंदकुमार चौधरी,प्रमोद लोहकणे, कृष्णा मोरगे,भाऊसाहेब निपुंगे,दिपकराव गाडे,रमेश बेलकर,बाळासाहेब घोडे, बापूसाहेब बनकर,रावसाहेब मुळे,सुनील कराळे,लक्ष्मण ढोकळे,दत्तात्रय मोरगे, चंद्रकांत दरंदले,विपुल ताके यांच्यासह अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
