श्रीरामपूर-
नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मा.खा.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध चित्रकार भालचंद्र जगनाडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साकारलेल्या चित्रांचे चित्रप्रदर्शन श्रीरामपूर भाजपाच्या वतिने आयोजित करण्यात आले.चित्र प्रदर्शनाचे उदघाट्न भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पटारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर,मा.नगरसेवक श्रीनिवास बिहाणी,आशिष धनवटे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,महिला मोर्च्या शहरध्यक्ष स्वातीताई चव्हाण,मा.नगरसेविका वैशालीताई चव्हाण,पुजाताई चव्हाण,सौं पुष्पलता हरदास,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पटारे,रुपेश हरकल,असिभाई पोपटीया, मनोज भिसे आदीसह भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी चित्रकार भालचंद्र जगनाडे यांचा यथोचित सन्मान दिपक पटारे यांच्या हस्ते करण्यात आला.चित्र प्रदर्शन यशस्वी करण्याकामी आयोजक भाजपा शहर सरचिटणीस विशाल अंभोरे,मा.नगरसेवक मनोज लबडे,भाजपा शहर उपाध्यक्ष विजय आखाडे, सुबोध शेवतेकर यांच्या सह भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
