ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा- आ.ओगले;श्रीरामपूर मतदारसंघात ढगफुटी सदृश्य पाऊस

श्रीरामपूर-बळीराजा चहूबाजूंनी अडचणीत सापडला असून तुटपुंजी मदत देऊन काहीही होणार नसून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आमदार हेमंत ओगले...

श्रीरामपूर-
बळीराजा चहूबाजूंनी अडचणीत सापडला असून तुटपुंजी मदत देऊन काहीही होणार नसून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे. काल रात्रभर श्रीरामपूर- राहुरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून आमदार हेमंत ओगले यांनी सकाळीच विविध गावांना भेटी देऊन आढावा घेतला आहे. तसेच झालेल्या 100 टक्के नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहे  काही ठिकाणी घरांचे देखील पडझड झाली असून त्याची देखील पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत जवळपास सगळीकडेच १०० मिलिमीटर पेक्षा अधिकचा पाऊस पडला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले त्यामध्ये सरला याठिकाणी पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्या पंधरा लोकांना बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.यावेळी आमदार ओगले म्हणाले की, या अस्मानी संकटात आम्ही सगळे मायबाप शेतकऱ्यांच्या सोबत आहोत सरकारने देखील कुठल्याही नियमांचे आडकाठी न आणता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करणे आवश्यक आहे. पुढील दोन ते तीन दिवस आणखी धोक्याचे असून हवामान खात्याने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. संबंधित शासकीय यंत्रणेला देखील आपण सूचित केले असून कोणीही मुख्यालय सोडू नये आश्या सुचना दिल्या असल्याचे सांगीतले.याबाबत कोणतीही अडचण आल्यास मला अथवा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपस्थित होते. आमदार ओगले यांनी निमगाव खैरी, गोंडेगाव, माळेवाडी,सराला, ब्राम्हणगाव भांड, चांदेगाव, बेलापूर बु. सातभाई वस्ती या ठिकाणी भेटी देत नुकसानीची पाहणी केली आहे.

आ. हेमंत ओगले यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!