प्रवरा नदीवरील पुलावरून उडी घेऊन एकाची आत्महत्या?;बेलापूर येथील घटना

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्रवरा नदीवरील पुलावरून एका जणाने नदीत उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत अजून पोलीसांनी अधिकृत...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्रवरा नदीवरील पुलावरून एका जणाने नदीत उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत अजून पोलीसांनी अधिकृत कुठलीही माहिती दिली नाही. प्रवरा नदीवरील पुलावर पोलिसांच्या पथकाकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे.परंतु पाऊस जोराचा सुरू असल्याने त्यात अडथळे येत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आज शनिवार दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळ एका अज्ञाताने बेलापूर येथील प्रवरा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.सदर व्यक्ती नदीत उडी मारत असताना तेथील काही जणांनी या व्यक्तीला पाहिले.त्याने पांढरा शर्ट घातलेला असल्याचे या प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर बेलापूर खुर्दचे पोलीस पाटील युवराज जोशी हे घटनास्थळी आले होते.त्यांनी पोलिसांना घटनेबाबत कळवल्यानंतर बेलापूर पोलीस घटनास्थळी हजर झाले.पोलिसांनी त्यानंतर त्या व्यक्तीची शोधमोहीम सुरू केली. साधारण 2 ते 3 तास शोध घेतल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने सदर व्यक्ती मृत झाल्याचीच शक्यता व्यक्त केली जात आहे.परंतु याबाबत अधिकृतरित्या पोलिसांनी कळवलेले नाही.
हा व्यक्ती कोण होता? त्याने नदीत उडी मारून आपले जीवन का संपवले याची माहिती अजून समजली नाही.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!