अतिक्रणकारवाईग्रस्त दुकानदारांचे तात्काळ पुनर्वसन करा;भाजपा कार्यकर्त्यांचे नायब तहसीलदारांना निवेदन

श्रीरामपूर-जानेवारी–फेब्रुवारी महिन्यात राबवण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे श्रीरामपूर शहरातील सुमारे दोन ते सव्वा दोन हजार दुकाने जमीनदोस्त झाली. या कारवाईमुळे हजारो कुटुंबांचा...

श्रीरामपूर-
जानेवारी–फेब्रुवारी महिन्यात राबवण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे श्रीरामपूर शहरातील सुमारे दोन ते सव्वा दोन हजार दुकाने जमीनदोस्त झाली. या कारवाईमुळे हजारो कुटुंबांचा प्रपंच रस्त्यावर आला असून त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे ठप्प झालेला आहे.
या दुकानदारांचे तात्काळ पुनर्वसन व्हावे, यासाठी समर्पित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कचेरीत नायब तहसीलदार श्री. शिंदे यांना निवेदन दिले. दुकानदारांना पूर्वी ज्या ठिकाणी दुकाने होती त्याच ठिकाणी किमान पाच बाय पाच फुटांच्या गाळ्यांच्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.निवेदनकर्त्यांनी सांगितले की, ३५ ते ४० वर्षांपूर्वी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी या दुकानदारांना रस्त्याच्या कडेला जागा देऊन त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सोडवला होता. मात्र सध्याच्या अतिक्रमण मोहिमेमुळे हजारो कुटुंबे उपासमार व संकटात सापडली असून त्यांचे मानवी दृष्टीकोनातून पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा उपोषण, धरणे, रास्ता रोको अशा लोकशाही मार्गांचा अवलंब करावा लागेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
या निवेदन प्रसंगी भाजप व हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते, माजी नगरसेवक व शहराध्यक्ष किरण लूनिया, भाजपचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे, संजय यादव, गणेश भिसे, बाळासाहेब अहिरे, तुषार बोबडे, शेखर आहेर, सिद्धार्थ साळवे, अर्जुन करपे, सोमनाथ पतंगे, बाळासाहेब गाडेकर जना सोनवणे, रमेश शिनगारे, राजू देवकर, विलास राऊत, किशोर बिंगले, शिवाजी सूर्यवंशी, विशाल जाधव, विकी चव्हाण, रवींद्र चव्हाण, संदीप धनेदर, सोमनाथ मढीकर, प्रशांत मोरे, अशोक लोखंडे आदींसह समर्पित भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कचेरीत नायब तहसीलदार श्री. शिंदे यांना निवेदन दिले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!