रात्रीतून उभ्या केलेल्या टपऱ्यांवर नगरपालिकेचा हातोडा; श्रीरामपूर-नेवासा रोडवरील अतिक्रमणावर धडक कारवाई

श्रीरामपूर-शहरात अतिक्रमणाविरोधात पुन्हा एकदा धडक कारवाई करण्यात आली आहे.आज दि.23 रोजी नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पाटबंधारे विभागाच्या कार्यालया समोर रात्रीतून थाटण्यात...

श्रीरामपूर-
शहरात अतिक्रमणाविरोधात पुन्हा एकदा धडक कारवाई करण्यात आली आहे.आज दि.23 रोजी नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पाटबंधारे विभागाच्या कार्यालया समोर रात्रीतून थाटण्यात आलेल्या पत्र्याच्या टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करून टाकण्यात आल्या आहेत.दरम्यान या कारवाईने पुन्हा एकदा शहरात खळबळ उडाली आहे.या बाबतीत सविस्तर माहिती अशी की,आज दि.23 सप्टेंबर रोजी नेवासा रोडवरील पाटबंधारे विभागाच्या कार्यालय समोरील जागेत काही जणांनी लोखंडी टपऱ्या टाकल्या होत्या.

याची माहिती नगरपालिका प्रशासनास मिळाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने रात्रीतुन टाकलेल्या या लोखंडी टपऱ्या पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्यावतीने धडक कारवाई करून उद्ध्वस्त करून जप्त केल्या.तसेच सर्व संबंधित अतिक्रमण करणाऱ्यांवर नगरपालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील कारवाई प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशानुसार नगरअभियंता सूर्यकांत गवळी,अतिक्रमण विभाग प्रमुख संजय शेळके, लक्ष्मण लबडे ,प्रशांत जगधने, अमोल दांडगे, राम शेळके, सुनील केदारे सिद्धार्थ साळवे,राजू कांबळे,संतोष डगळे यांच्या पथकाने केली आहे.

नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पाटबंधारे विभागाच्या कार्यालया समोर रात्रीतून थाटण्यात आलेल्या पत्र्याच्या टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केल्य .
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!