श्रीरामपूर- शनिदेव गाव व सप्ताह कृषी येथे 30 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान पार पाडलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या 178 वा अखंड हरिनाम सप्ताह ऐतिहासिक ठरला.या सप्ताहातील आमटीची नोंद शिर्डी येथील साईसंस्थानने घेतली असून ते दर गुरुवारी संस्थानच्या अन्नछत्रालयात आमटी भाकरीचा महाप्रसाद ठेवणार असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरीजी महाराज यांनी केले. महंत रामगिरी यांच्या हस्ते ध्वज अवतरण सोहळा पार पडला. गिनीज बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद असलेला आशिया खंडातील सर्वात मोठा वारकऱ्यांचा महा कुंभ समजला जाणारा योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 178 वा सप्ताह यावर्षी गोदातीरी शनिदेव गाव चेडुकळ, बाजाठाण,अव्वलगाव ,हमरापुर ,कमलपुर भामाठाण या सप्तक्रोषी मध्ये संपन्न झाला. छोटे छोटे गावे व शेतकरी भाविक भक्त यांच्या परिश्रमातून तन मन धन ओतून झालेला सप्ताह ऐतिहासिक ठरल्याचे महंत रामगिरी महाराज म्हणाले. सप्ताह कमिटी व भाविक भक्तांनी 178 व्या सप्ताहाचे महत रामगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सुंदर नियोजन करून आतापर्यंतच्या सप्ताहातील सर्व सप्ताहा पेक्षा सर्वात जास्त शिल्लक राहिलेल्या रक्कम 42 लाख 28 हजार 834 रुपये हे गोदाधाम सरला बेट संस्थानकडे वर्ग करण्यात आले असून बेटाच्या विकासकामासाठी ही रक्कम वापरण्यात येणार असल्याचे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार संदिपान भुमरे साहेब, आमदार रमेश पा बोरणारे सर,माजी सभापती अविनाश पाटील गंलाडे,ऊपविभागिय अधिकारी डॉ अरुण जराड साहेब, डॉ प्रकाश शेळके, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, विश्र्वनाथगिरीजी महाराज,योगेंन्दगिरीजी महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज, याच्या सह सप्ताहा नियोजन समिती सदस्य, पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमटी भाकरीचा प्रसाद आता शिर्डीच्या प्रसादालयात योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांनी लेने को हरिनाम देणे को अन्नदान या ऊव्तीला अनुसरून सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह व शिर्डीच्या साईबाबाची ओळख समाजाला करून देणारे योगीराज गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहातील आमटी भाकरी चा स्वाद हा आता शिर्डी संस्थांच्या प्रसादालयात येणार आहे आमटी भाकरी म्हटलं तर लगेच गंगागिरी महाराज यांचा जगप्रसिद्ध सप्ताह डोळ्यासमोर उभा राहतो. यात सप्ताहातील आमटी भाकरी आता दर गुरुवारी शिर्डी येथील प्रसादालयात सुरू झाली असल्याचे माहिती महंत रामगिरीजी महाराजांनी यावेळी दिली.
178 व्या शनिदेव गाव सप्ताहाचा ध्वज अवतरण सोहळा पार महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते पडला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या
श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या
श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी